चार हजार गाणी लिहणारे राहताय कुडाच्या घरात

गीतकार प्रकाश पवार जगताहेत हलाखीचे जीवन
चार हजार गाणी लिहणारे राहताय कुडाच्या घरात


नाशिक । Nashik

'सुया घे, दाभन घे' यासह चार हजारहून अधिका गाणी लिहणारे कवी प्रकाश पवार (Lyricast Prakash Pawar) यांच्या पदरी आज हालअपेष्टा असून कसारा (Kasara) येथे कुडाच्या घरात राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. एकेकाळी आपल्या गाण्यांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवणारे आज राज्य शासन देत असलेल्या दोन हजार रुपयांच्या तुटपुंज्या मानधनावर (Help Assistance) गुजराण करावी लागत आहे.

मूळचे देवळा (Deola Village) गावचे रहिवाशी असणारे पवार कुटुंबीय गेल्या अनेक वर्षापासुन कसारा येथे वास्तव्यास आहे. १९७४ मध्ये त्यांनी "बाई सुया घे ग,दाभण घे "हे गित लिहले. हे गीत गायक प्रल्हाद शिंदे (Singer Pralhad Shinde) यांच्या घराण्यातील गायिका रंजना शिंदे यांनी आपल्या कर्णमधुर स्वरांनी हे गित गायले. पुढे हे गीत अजरामर झाले. मात्र या गिताला जन्माला घालणारा अवलिया मात्र आजही कसाऱ्या सारख्या ठिकाणी कुडाच्या घरात रहातो आहे.

काही वर्षापुर्वी त्यांचा सुपुत्र देवदत्त पवार व सुन यांचे निधन झाल्याने घरातील आठ सदस्यांची देखभाल करण्याची जबाबदारी या वयोवृध्द लोककलावंतावर आली. तशा परिस्थितीवरही मात करत हा लोककलावंत कुणाकडेही हात न पसरता आपले स्वाभिमानी जीवन जगत आहे. तसेच महाराष्ट्र शासनाकडून (state Goverment) मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधनावर आपली गुजराण करून कला जोपासत आहे.


दरम्यान या उपेक्षित कलाकाराला आजही जिवनासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यांच्या निवाऱ्यासाठी शासकिय कोट्यातुन निवाऱ्याची सोय, कुुंटुंबातील व्यक्तिला शासकिय नोकरी किंवा आर्थिक मदत मिळावी हीच माफक अपेक्षा कला प्रेमींकडुन व्यक्त करण्यात येत आहे.


अजरामर गीत

पवार यांनी अनेक गीते लिहली परंतु सुया घे दाभन घे या गाण्याने सर्व रसिकांच्या मनावर अधिराज्य केले.त्याकाळी कॅसेटमधूनही गीत रेकॉर्ड करून कंपनीने त्या गित प्रसारित केले. त्यावेळी रेकॉर्ड प्लेट (मायक्रो फोन)ची व्यवस्था होती.

लोककलावंत तारुण्यात आपली कला उमेदीने समाजापर्यंत पोहचविण्याचे काम करत असतो. उद्देश एकच आपल्या कलेतून समाजप्रबोधन व्हावं. तेव्हा समाजात त्याची वाहवाह होते. मात्र कलावंताच्या उतारवयात त्यांच्याकडे समाजासह शासनाने लक्ष देणे आवश्यक आहे.

- प्रकाश पवार, कवी.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com