लंपी लसीकरण मोहिमेची सीईओ मित्तल यांनी केली पाहणी

जिल्ह्यात ६१ टक्के लसीकरण
लंपी लसीकरण मोहिमेची सीईओ मित्तल यांनी केली पाहणी

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये लंपी (Lumpy) या संसर्गजन्य आजाराने बाधित जनावरे आढळल्याने जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने (Zilha Parishad Animal Husbandry Department) मोठ्या प्रमाणावर लसीकरणास (vaccination) सुरवात केली आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल (Zilha Parishad Chief Executive Officer Ashima Mittal) यांनी नाशिक तालुक्यातील (nashik taluka) गिरणारे (girnare) येथे भेट देत लसीकरण मोहिमेची (Vaccination campaign) पाहणी केली.

यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी लसीकरण मोहिम कशी सुरू आहे, याबद्दल विचारले असता ग्रामस्थांनी लसीकरण मोहिमेबद्दल समाधान व्यक्त केले.  नाशिक जिल्ह्यात (nashik district) आठ लाख ९५ हजार ५० जनावरे असून यापैकी पाच लाख ५१ हजार ९८० जनावरांचे लसीकरण (vaccination) पूर्ण झाले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आशिम मित्तल यांनी दिली.

यावेळी जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ.विष्णुपंत गर्जे (District Animal Welfare Officer Dr. Vishnupant Garje), गट विकास अधिकारी डॉ सारिका बारी, गिरणारे पशुवैद्यकीय दवाखान्याचे अधिकारी डॉ. भगवान पाटील, पशुधन विकास अधिकारी विस्तार डॉ किरण आठरे, डॉ वैभव शिंदे, डॉ आनंदा कुटे, डॉ सुनील संत, डॉ युवराज वाणी, डॉ राजेंद्र बोरसे, विस्तार अधिकारी पंचायत सोनवणे, श्रीधर सानप, देवा खोरटे, रवींद्र थेटे, प्रकाश वाघ, रमेश सोनवणे आदी उपस्थित होते.

सीईओ मित्तल यांचा अभिप्राय

आज मी गिरनारे पशूसंवर्धन केंद्राला भेट दिली. येथील स्टाफने आतापर्यंत ८० टक्के लसीकरण पूर्ण केले आहे. पशुधनासाठी लंपी हा आजार रोखण्यासाठी हे लसीकरण अतिशय महत्वाचे आहे. स्टाफने घेतलेले कष्ट अतिशय महत्वाचे आहे. त्याबाबत त्यांचे कौतुक. त्यांनी लसीकरण पूर्ण करण्यासाठी आणखी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com