वसुलीचा ढोल झाला थंड

वसुलीचा ढोल झाला थंड

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दिवाळीनंतर (diwali) मनपाने घरपट्टी (house tax) थकबाकीदारांच्या घरापुढे ढोल वाजवण्यास पुन्हा सुरुवात केली असली तरी वसुलीला थंड प्रतिसाद मिळत आहे.

गुरुवारी (दि.१०) अवघे ११ लाख रुपये वसूल झाले होते. मागील आठ दिवसात पाच कोटी ६१ लाखांची घरपट्टी वसूल झाली आहे. 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण थकबाकी वसूल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Municipal Commissioner and Administrator Dr. Chandrakant Pulkundwar) यांनी कर विभागाला (Tax Department) दिले आहे.

एक लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या आस्थापना, व्यावसायिक व नागरिकांच्या घरासमोर ढोल वाजविला जात आहे. मागील १७ आॅक्टोबरला ही मोहीम सुरु झाली. पहिल्या तीन दिवसात तीन कोटीच्या आसपास थकबाकी वसूल (Recovery of arrears) झाली. दिवाळीत (diwali) ही मोहीम बंद होती. त्यानंतर पुन्हा मागील मंगळवारपासून (दि.२) ही मोहिम सुरु करण्यात आली. ३५ लाख ४५ हजार रुपयांची कर वसुली झाली.

दिवाळीनंतर वसुलीत मोठी घट झाल्याचे आकडेवारीवरुन पहायला मिळत आहे. मागील आठवड्यात केवळ अडीच कोटीच्या जवळपास वसुली झाली. दरम्यान,एक लाख किंवा त्यापेक्षा जास्त थकबाकी असलेले एकूण १२५८ थबबाकीदार आहेत. आतापर्यंत ७४४ जणांच्या घर व आस्थापनांसमोर ढोल वाजवण्यात आला आहे.

विभागनिहाय कर वसुली

ना.पश्चिम– १ कोटी ९२हजार

ना. पूर्व - ५९ लाख ५२ हजार

ना.नाशिक - ८८ लाख २५ हजार

पंचवटी - ८९ लाख ९३ हजार

नाशिक रोड- ७० लाख ९९ हजार

सातपूर - ५९ लाख ९० हजार

एकूण - पाच कोटी ६१ लाख

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com