वन विभागाच्या नर्सरीतून रोपे घेण्यास नागरिकांचा निरुत्साह

गेल्या वर्षीच्या तुलनेत महसूलात निम्याने घट
वन विभागाच्या नर्सरीतून रोपे घेण्यास नागरिकांचा निरुत्साह

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

वन विभागाकडून (Forest Department) जिल्ह्यात दि.15 जून ते 30 सप्टेंबरदरम्यान वन महोत्सवाचे (Forest Festival) आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाअंतर्गत नागरिकांना वन विभागाच्या रोपवाटीकेतून (Forest Department Nursery) 21 रुपयांचे रोप अवघे 10 रुपयांना दिले जात आहे. असे असूनही नागरिकांकडून रोपे घेण्यात निरुत्साह (Discouraged) असल्याचे दिसत आहे...

पश्चिम वनक्षेत्रातील गंगापूर (Gangapur) येथील वनविभागाच्या रोप वाटिकेतून गेल्यावर्षी किरकोळ विक्रीतून लाखोंचा महसूल (Revenue) जमा झाला होता. यंदा मात्र अवघा 44 हजारांचाच महसूल जमा झाला आहे. यंदाच्या वर्षी नागरिकांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

प्रत्येक वर्षी वृक्षारोपण मोहिमेत (Tree Plantation Campaign) नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग वाढावा, याकरिता वनविभागाकडून विशिष्ट कालावधीकरिता नागरिकांना स्वस्तात रोपे दिली जातात.

मागील वर्षी कोरोनाचा (Covid-19) प्रादुर्भाव वाढल्याने सामाजिक सह प्रादेशिक वन विभागाकडून कमी प्रमाणात रोपण करण्यात आले होते. मात्र नागरिकांचा गेल्या वर्षी रोपे घेण्यासाठी पश्चिम वनविभागाच्या रोपवाटीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र होते.

त्यावेळी किरकोळ विक्रीतून वनविभागाकडे लाखोंचा निधी जमा झाला होता, यंदाही वनविभागाने रोपवाटिकेत रोपे तयार करुन ठेवली आहेत, परंतु जसा नागरिकांचा प्रतिसाद हवा तसा मिळ्त नसल्याचे चित्र आहे. यामुळे यंदा वनविभागाकडे केवळ 44 हजारांचा महसूल जमा झाला आहे.

गंगापूर येथील रोपवाटीकेत जांभुळ, बांबू आणि चिंच एवढीच रोपे उपलब्ध आहे. यंदा प्रादेशिक व सामाजिक वनीकरण विभागाकडून लाखोंच्या संख्येने रोपण केले जाणार असल्याने या विभागाचे बुकींग रोपवाटीकेत आधीच करण्यात आले आहे.

रोपे घेण्यासाठी येणार्‍या नागरिकांनाही रोपे दिली जात असल्याचे वनविभागाने म्हंटले आहे. शासकीय दरानुसार एक रोप 21 रुपयांना मिळ्ते, मात्र वनमहोत्सव असल्याने हेच रोप 10 रुपयांना दिले जात आहे. सप्टेंबरनंतर पुन्हा रोपांच्या किंमती वाढणार आहे.

गेल्या वर्षी कोरोनामुळे वनविभागास रोपण करण्यात आले नव्हते, यंदा मात्र प्रादेशिक वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाकडून (Department of Social Forestry) वृक्षारोपणाची जोरदार तयारी सुरु आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com