प्रेयसीने बोलणे बंद केले; प्रियकराचा हल्ला

प्रेयसीने बोलणे बंद केले; प्रियकराचा हल्ला
Crime news

नाशिक । प्रतिनिधी । Nashik

प्रेयसीने प्रियकराशी अचानकपणे बोलणे व भेटणे बंद केल्याने प्रियकराला राग आल्यामुळे संतप्त झालेल्या प्रियकराने प्रेयसीला मारहाण (Beating) करून एका धारदार शस्त्राने (sharp weapons) तिच्यावर हल्ला (Attack) करून जखमी केल्याचा प्रकार देवी चौक नाशिकरोड (Nashik Road) परिसरात घडला असून याप्रकरणी प्रेयसीच्या तक्रारीनंतर नाशिकरोड पोलिसांनी प्रियकराला (boyfriend) अटक (Arrested) केली आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, सदरची पीडित तरुणी ही जेलरोड परिसरात राहणारी असून प्रियकर सुद्धा जेलरोड परिसरात राहतो. शुभम अरुण घोलप (Shubham Arun Gholap)असे प्रियकराचे नाव असून त्याची प्रेयसी ही नाशिकरोड परिसरातील देवी चौकातील (Devi Chowk) एका ज्वेलर्सच्या दुकानात ( jeweller's shop) काम करते.

गेल्या पाच ते सहा वर्षापासून दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. परंतु गेल्या काही दिवसापासून प्रेयसी ही शुभम बरोबर बोलत नव्हती. तसेच प्रेयसी भेटत नसल्याने शुभमला राग अनावर झाला व त्याने प्रेयसीला देवी चौकात गाठले. त्यानंतर दोघांचे भांडण झाले व भांडणानंतर प्रियकर शुभम घोलप याने तिला मारहाण केली. तसेच जवळ असलेल्या कटर सारख्या धारदार शस्त्राने तिच्या डाव्या हाताच्या मनगटावर हल्ला करून जखमी केले.

दरम्यान, या घटनेनंतर प्रेयसीने तातडीने पोलिस स्टेशन (Police station) गाठले व शुभम घोलप विरुद्ध तक्रार (FIR) दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने शुभमला अटक केली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Senior Police Inspector) अनिल शिंदे (Anil Shinde) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश नायदे (Ganesh Naide) सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके, हवलदार हिरे हे करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com