सापडलेला मोबाईल पोलिसांच्या स्वाधीन

महिलेचा प्रामाणिकपणा
सापडलेला मोबाईल पोलिसांच्या स्वाधीन

देवळाली कॅम्प । वार्ताहर Devlali Camp

येथील मार्केट परिसरात ( Devlali Camp Market ) प्रेस कर्मचारी विवेक घमेंडी यांचा 30 हजार रूपये किमतीचा मोबाईल गहाळ ( Mobile Lost ) झाला होता. सदर मोबाईल शहरात खरेदीसाठी आलेल्या महिला स्मिता जगताप ( Smita Jagtap ) व जयश्री अरिंगळे( Jayshree Aringle ) यांना सापडला. त्यांनी स्थानिक पोलिस स्टेशन गाठून तो मोबाईल ठाणे अंमलदारांकडे जमा केला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात खरेदीसाठी आलेल्या घमेंडी नामक व्यक्तीचा मोबाईल गहाळ झाला होता. सदर व्यक्तीने पोलीस स्टेशन गाठत माहिती दिली. त्याच वेळी दोन महिला देखील पोलिस ठाण्यात आल्या व आपणास शहरात मोबाईल सापडला असून जमा करुन घ्या, असे सांगितले.

पोलिसांनी मोबाइल हरवलेल्या व्यक्तीची खात्री करून मोबाईल परत केला. या प्रामाणिकपणाबद्दल स्मिता जगताप यांचा सत्कार करण्यांत आला. यावेळी पोलिस निरीक्षक.एस.एस. पाडवी, ठाणे अंमलदार विष्णु निसाळ, पो.ह. सुनिल शेवाळे, शाम कोटमे आदींसह रिपाइं युवक शहराध्यक्ष रविंद्र गायकवाड, सचिन भालेराव, आनंद वैरागर, सोनटी पारचा आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com