'या' करणामुळे शेतकर्‍यांचे नुकसान

 'या' करणामुळे शेतकर्‍यांचे नुकसान

करंजीखुर्द। वार्ताहर Niphad

राज्यात झालेल्या अतिवृष्टीच्या (heavy rain) प्रकोपामुळे लाल कांदा (red onion) उत्पादनात मोठ्या प्रमाणत घट झाली. दिवाळीनंतर (diwali) लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होऊन बाजारपेठा विक्रीसाठी सज्ज आहेत. परंतु सध्या 99 टक्के बाजारपेठांमध्ये लाल कांदा आवक नाही. त्यामुळे उन्हाळ कांद्याची (Summer onions) दरवाढ होईल अशी खात्री शेतकर्‍यांना निर्माण झाली होती.

लाल कांद्यात झालेला तोटा उन्हाळ कांदा विक्रीतून भरावा या आशेने बहुसंख्य शेतकर्‍यांनी साठविलेल्या कांद्याची दिवाळीनंतर विक्री करावी या आशेने चाळीत ठेवला होता. परंतु कोसळत्या बाजारभावामुळे कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. सध्या बाजारात विक्रीस आलेला कांदा हा सुरुवातीस डोंगळे लागवड, संगोपन, बी निर्मिती, रोपनिर्मिती, त्यानंतर लागवड, खते, औषधे, मशागत,

निंदणी, कांदा काढणी, साठवणूक आणि विक्री या टप्प्यातून ते सहा महिन्याच्या मेहनतीनंतर कांदा पीक हातात येते. त्यानंतर चाळीत साठवलेला कांदा पुन्हा चार महिन्यानंतर विक्री करतेवेळी वजनात घट तसेच चाळीत साठविल्याने अति उष्णता व पाऊस यामुळे कांदा सडणे, प्रतवारी खराब होणे यामुळे कांदा पिकात निम्मी घट होते. त्यामुळे या सर्व घटकांचा विचार करता कांदा किमान 5 हजार रुपयांपेक्षा अधिक दराने विक्री होणे अपेक्षित होते.

परंतु सध्या अत्यल्प कांदा शिल्लक असल्याने व कांद्याचे भाव वाढत असतांनाच शहरी जनतेतून कांदा बाजारभावाची ओरड होऊ नये यासाठी केंद्र सरकारने (central government) कांदा आयात (Onion import) करून आणि बंफर स्टॉकमधील कांदा बाजारात विक्रीस आणून देशांतर्गत कांद्याचे बाजारभाव स्थिर केल्याने याचा सर्वाधिक फटका शेतकर्‍यांना बसला आहे.

दिवाळीपूर्वी कांदा सरासरी 35 ते 40 रुपये प्रति किलोने विक्री होत होता. दिवाळीनंतर सरासरी 15 ते 20 रू. प्रती किलो दराने विक्री होत आहे. 15 ते 20 दिवसात कांदा दरात 20 रू. प्रती किलो भावात घट झाली आहे. महापूर अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीमुळे खचलेल्या शेतकर्‍यांना कांदा बाजारभाव वाढीमुळे मोठा आधार मिळाला असता. परंतु सरकारने शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहणे सोडून कांदा आयात केल्याने शेतकर्‍यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com