घाटमाथ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

घाटमाथ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

बोलठाण । वार्ताहर | Bolthan

नांदगाव तालुक्यातील (nandgaon taluka) बोलठाण (bolthan) येथे आ. सुहास कांदे (mla suhas kande), आ. रमेश बोरणारे (mla ramesh bornare), आ. उदयसिंह राजपूत (mla udayisign rajput) यांच्या प्रमुख उपस्थिती गोकुळ कोठारी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत (shiv sena) जाहीर प्रवेश केल्याने घाटमाथ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसला (Nationalist Congress) मोठे खिंडार पडून शिवसेनेची ताकद वाढली आहे.

प्रवेश सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठनेते बापूसाहेब कवडे (Senior leader Bapu Saheb Kavade) होते. यावेळी बोलतांना आ. कांदे यांनी कोठारींचे स्वागत करत आजपासून आपण शिवसेना (shiv sena) कुटूंबात सामील झाले असून यापुढे तुमच्या सुख-दुःखात आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू, असे आश्वासित केले. घाटमाथ्यावर विकासकामे (Development work) सुरू असून यापुढेही विकासाची घोडदौड सुरू राहील, अशी ग्वाही आ. कांदे यांनी दिली.

कोठारी यांनी मनोगत व्यक्त करतांना आ. कांदे यांच्या कार्याचे कौतुक करत परिसराच्या समस्या आ. कांदे यांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी प्रयत्न करू व शिवसेना (shiv sena) बळकट करण्यासाठी निरंतर कार्यरत राहू, असे सांगितले. यावेळी अजीम काजी, फैयाज सय्यद, मुजम्मिल सय्यद, विनोद साबळे, अनिता असावा, पोपट मोरे, ठकूबाई पवार तर जातेगावचे संतोष गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली संतोष गायकवाड, बाळू पवार, सुरेश जाधव, किरण चव्हाण, नामदेव वर्पे, कडूबा त्रिभुवन, नंदू मोरे तसेच चंदनपुरीचे ईश्वर राठोड यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी तेज कवडे, राजेश कवडे, विलास आहेर, किरण देवरे, गुलाब भाबड, अमोल नावंदर, सुनील जाधव, एन.के. राठोड, अनिल रिंढे, रफिक पठाण, संजय बोरसे, मनोज रिंढे, गीतराम पवार, अण्णा शिंदे, गुलाब चव्हाण, शशी मोरे, हर्षल पवार, प्रकाश शिंदे, चंद्रकांत जाधव, अर्जुन पाटील, दत्तात्रय पाटील, जितेंद्र पाटणी, अनिल कायस्थ, राजेश नवले, घाटमाथ्यावरील शिवसेनेचे सरपंच, पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब सूर्यवंशी यांनी केले तर शेवटी शिवसेना शहर प्रमुख संजय बोरसे यांनी आभार मानले.

मनेगाव पाटी रस्ता दुरूस्तीचे काम मार्गी

नांदगाव, वैजापूर व कन्नड अशा तिन मतदार संघांचे आमदार या प्रवेश सोहळ्यानिमित्त एका मंचावर आल्याने जनतेकडून मनेगाव पाटी रस्त्याबाबत जोरदार मागणी करण्यात आली. रस्त्याची परिस्थिती व सर्व स्तरावर होत असलेल्या मागणीबाबत सकारात्मक प्रतिसाद देत वैजापूरचे आ. रमेश बोरणारे यांनी येत्या 8 दिवसात 1 कि.मी. रस्ता करून देण्याचे अश्वासन दिले तर कन्नडचे आ. उदयसिंह राजपूत यांनी या रस्त्यासाठी 25 लाख रुपये निधी जाहीर केला. त्यामुळे सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आता सुटेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Related Stories

No stories found.