पं. प्रभाकर दसककर यांच्या निधनाने संगीत क्षेत्राची हानी

मान्यवरांचे शोकसंदेश
पं. प्रभाकर दसककर यांच्या निधनाने संगीत क्षेत्राची हानी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिकमधील ज्येष्ठ संगीत शिक्षक तसेच वादक म्हणून ख्याती असलेले पंडित प्रभाकर गोविंदशास्त्री दसककर (94) Pandit Prabhakar Govindshastri Dasakkar यांच्या पार्थिवावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले.

दसककर गुरुजींनी अनेक विद्यार्थ्यांना संगीताचे ज्ञान दिले. नाशिकमधील महिलांचे पहिले भजनी मंडळ सुरू केले. हजारो विद्यार्थी घडवले. नाशिककरांमध्ये संगीताची आस्था निर्माण करण्यात त्यांचे मोलाचे योगदान होत अशा भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केल्या. गुरुजींच्या जाण्याने संगीत क्षेत्रात न भरून येणारी पोकळी निर्माण झाल्याचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहताना सांगितले.

यावेळी पं.अविराज तायडे, मकरंद हिंगणे, नितीन वारे, नितीन पवार, प्रशांत महाबळ, मोहन उपासनी, आर्कि. संजय पाटील, सुनील देशपांडे, विवेक गरुड, गिरीश पांडे, सुरेश कपाडिया, आनंद ढाकीफळे, प्रमोद पुराणिक, लोकेश शेवडे, मिलिंद गांधी, रमेश देशमुख, ज्ञानेश्वर कासार, आशिष रानडे, गौरव तांबे, डॉ. कुणाल गुप्ते, ऋतुराज पांडे आदींसह संगीत, सामाजिक, उद्योग व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

ज्येष्ठ हार्मोनियम वादक पंडित प्रभाकर गोविंदशास्त्री दसककर यांची नाशिकमधील ज्येष्ठ संगीत शिक्षक, वादक म्हणून ख्याती होती.ज्या काळात महिलांना गाणे म्हणणे किंवा शिकणे वर्ज्य होते, त्या काळात त्यांनी ज्ञानेश्वर महिला भजनी मंडळाची स्थापना करून अनेक महिलांना संगीत शिक्षण दिले. संपूर्ण हरिपाठाला रागदारीतील वैविध्यपूर्ण रागांंमध्ये संगीतबद्ध केले. संगीत क्षेत्रातील त्यांचे योगदान अतिशय महत्वपूर्ण असून त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झालेली आहे.

छगन भुजबळ, पालकमंत्री Chhagan Bhujbal, Guardian Minister

पंं.दादासाहेब दसककर हे नाशिक क्षेत्रातील तज्ज्ञ संगीततज्ज्ञ म्हणून लाभलेले होते. बिकट परिस्थितीत संगीताची सेवा करण्याचे काम त्यांनी अव्याहतपणे सुरू ठेवले होते. त्यांनी आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून उत्तम कलावंत घडवले.प्रेमळ व मनमिळावू स्वभाव, शिक्षक म्हणून परखड मार्गदर्शन यां विविध गुणांमुळे माणूस म्हणून त्यांचे जनसामान्यांमध्ये वेगळे स्थान होते. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

पं.अविराज तायडे Pt. Aviraj Tayde

पंडितजींनी संगीताचे बीज रुजवायचे काम केले. त्यांनी खूप निष्ठेने व श्रध्देने संगीतोपासना केली.ते करताना केवळ घरातच नव्हे तर संंगीत प्रेमींच्या संंगीताच्या दोन पिढ्या घडवल्या. प्रसिद्धी, मानमरातब, पुरस्कार, सन्मान या सर्वांपासून दूर राहत कोणतीही अपेक्षा न ठेवता नि:स्पृहपणे मानापासून त्यांनी संगीताची सेवा केली.असे समर्पित व्यक्तीमत्व विरळेच.त्यांच्या निधनाने सगीत क्षेत्राचा आधारवड हरपला आहे.

रेखाताई नाडगौडा, कथ्थक नृत्यांगना Rekhatai Nadgauda, ​​Kathak dancer

संगीत सेवेसाठी आपले आयुष्य वेचणारे पं.प्रभाकर दसककर ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व होते. संगीत कलेच्या माध्यमातून त्यांनी लोकशिक्षणाचे कार्य केले. अनेकांमध्ये संगीतविषयक आवड निर्माण केली. अनेक संगीत विषयक कार्यशाळा, मार्गदर्शक शिबिरे यातून स्वर व सूर यांचे जीवनातील महात्म्य विशद केले. त्यांच्या कार्याचा वारसा आपण सर्वांनी पुढे नेणे त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल.

- विश्वास ठाकूर, संस्थापक अध्यक्ष, विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक

- Vishwas Thakur, Founder President, Vishwas Co-op. Bank Ltd., Nashik

पं. प्रभाकर दसककर यांनी संगीत सेवेसाठी आठ दशके आपले आयुष्य वेचले.नाशिकमधील एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व होते. संगीतकलेच्या माध्यमातून त्यांनी अनेकांमध्ये संगीताची आवड निर्माण केली.सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. नाशिक जिल्ह्यातील संगीत प्रेमी त्यांना कदापी विसरणार नाहीत.

कमलाकर वारे Kamalakar Vare

पंडित दसककर यांंच्या निधनाने नाशिकमधील संगीतकलेला समर्पित ऋषितुल्य व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. शहरातील संगीत प्रेमींना दर्जेदार शिक्षण देणार्‍या व्यक्तींमध्ये त्यांचे मोठे सन्मानाचे स्थान होते. शहरातील सुमारे तीन पिढ्यांनी त्यांच्याकडून संगीताचे धडे घेतलेले आहेत. त्यांनी त्यांचे संगीत ज्ञान त्यांच्या पुरते मर्यादित न ठेवता घरातील अनेक व्यक्तींना गायन क्षेत्रात तितकीच निपुणता मिळवून दिलेली आहे. कला क्षेत्रात परिवारातील अनेक सदस्य वारसा चालवत असल्याचे पाहण्याचे भाग्य क्वचितच वाट्याला मिळते. ते पंडितजींना मिळाले.आजोळशी संबंधित राहिल्याने सारडा कुटूंबीयांशी त्यांंचा एक पारिवारीक जिव्हाळा होता. त्यांच्या निधनाने शहरातील संगीत क्षेत्रात निर्माण झालेल्या पोकळीचे दु:ख सर्वच संगीतप्रेमींना झाल्याशिवाय राहणार नाही. अशा या पुण्यात्म्यास परमेश्वर सद्गती देवो व दसककर कुटूंबीयांना त्यांच्या निधनाचे दु:ख सहन करण्याची ईश्वर शक्ती देवो हीच प्रार्थना.

देवकिसन सारडा, संस्थापक, दै. देशदूत

Devakisan Sarda, Founder, Daily Deshdoot

Related Stories

No stories found.