तपोवनात उभारणार प्रभू श्रीरामांचे शिल्प; राज्य शासनाने दिली मंजूरी

तपोवनात उभारणार प्रभू श्रीरामांचे शिल्प; राज्य शासनाने दिली मंजूरी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पंचवटीतील (panchavati) तपोवनातील (tapovan) रामसृष्टीत 61 फुटी प्रभू रामचंद्रांचे शिल्प (Sculpture of Shri Ram) उभारण्याच्या कामाला राज्य शासनाने (State Govt) मंजूरी दिली असून

त्यासाठी कोटींचा निधी (fund) जाहीर केल्याने तपोवनातील श्रीरामाचे भव्य शिल्प पर्यटकांसाठी (Tourists) आकर्षणाचे केंद्र ठरेल, असा विश्वास आ. राहुल ढिकले (MLA Rahul Dhikle) यांनी व्यक्त केला.

पंचवटीतील प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्यामुळे पावन झालेल्या पंचवटीतील तपोवन परिसराची जागला वेगळी ओळख व्हावी व त्यामाध्यमातून प्रभु रामाने तप केलेल्या भुमींवर भाविकांंनी भेट देण्याच्या उद्देशाने 61 फूटाचे भव्य शिल्प उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी 19 ऑक्टोबर 2012 रोजी पर्यटन मंत्रालयाकडे (Ministry of Tourism) मागणी केली होती.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) व पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा (Tourism Minister Mangalprabhat Lodha) यांच्यापूढे शिल्पासंदर्भात संकल्पना मांडताच त्यांनी प्रस्तावाला तत्काळ होकार दर्शवला. व या शिल्पासाठी 5 कोटी रुपयांचा निधी देखिल मंजूर केला.

शहरातील काळाराम मंदिर जागतिक पातळीवर महत्त्व आहे. या ठिकाणी सीता गुंफासारखे स्थळ पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. या सोबतच तपोवनात अश्या भव्य शिल्पाद्वारे पर्यटकांना पवित्र स्थानाचे दर्शन करता यावे या दृष्टिकोनामधून हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.तपोवनामध्ये गेल्यानंतर प्रभू रामचंद्रांचे स्मरण करण्याच्या दृष्टिकोनातून 51 फूट भव्य मुर्ती उभारण्याचा मनोदय होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी तात्काळ 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.

तपोवनामध्ये गेल्यानंतर प्रभू रामचंद्रांचे स्मरण करण्याच्या दृष्टिकोनातून 51 फूट भव्य मुर्ती उभारण्याचा मनोदय होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी तात्काळ 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.

- अ‍ॅड. राहुल ढिकले, आमदार, नाशिक पूर्व

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com