बियाणे विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट

पाऊसही गायब, शेतकरी दुहेरी संकटात
बियाणे विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट
खते बियाणे ADMIN

नाशिक | Nashik

जिल्ह्यात (Nashik District) पावसाने (Rain) ओढ दिली असून शेतकरी (Farmers Wait For Rain) पावसाची वाट पहात आहे. शेतकऱ्यांनी जमिनीत असलेल्या ओलीवर खरिपाच्या पेरण्या (Kharip Sowing) करत आहेत. पाऊस लांबला तर काही ठिकाणी दुबार पेरणीचे (Double sowing) संकट आहे.

अशा बिकट परिस्थितीत बियाणे विक्रेत्यांकडून (Seed sellers) मात्र वाढीव किमती लावून शेतकऱ्यांची लूट (Plunder of farmers) केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. एकाच कंपनीच्या बियाण्यांची दोन दुकानांमध्ये वेगवेगळी किमत सांगितली जात असल्याने, शेतकऱ्यांमध्ये संभ्रम (Confusion among farmers) निर्माण होत आहे.

यातही मोठ्या बाजारपेठेपेक्षाही (Big Market) गावपातळीवरील दुकानदार तर मनमानी पद्धतीने दर आकारत असल्याचे चित्र आहे. कृषी विभागाचे (Agriculture Department) मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने, सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील बहुसंख्य तालुक्यांमध्ये शेतकरी मक्याची लागवड (Maize Sowing) करत आहेत. वेगवेगळ्या कंपन्यांचे मका बियाणे बाजारात उपलब्ध आहे. यातील एका कंपनीच्या बियाण्याला विशेष पसंती दिली जात आहे. सुरुवातीच्या काळात या बियाण्यांच्या एका पाकिटाची किंमत १,२०० रुपयांपर्यंत होती. मागणी वाढताच, विक्रेत्यांनी पाकिटाच्या किमतीमागे ५० रुपयांनी वाढ केली. गावपातळीवरील विक्रेते तर थेट १,४०० रुपये आकारत आहे.

अशीच सोयाबीनची (Soyabin) देखील असून जी 25 किलोची बॅग तीनशे रुपये पर्यंत होती त्या गोणीमध्ये आता पंचवीस किलोमागे साडे सहाशे ते सातशे रुपये अधिक मोजावे लागत आहे, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. एकाच कंपनीच्या बियाण्याची वेगवेगळी किंमत कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. अशीच परिस्थिती इतर बियानांची देखील आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com