पेठ l Peth (प्रतिनिधी)

पेठ तालुक्यातील निरगुडे येथील एका बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दागिने व रोख असा 46 हजार 200 रूपयाचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.

पेठ पोलीसांत निरगुडे येथील हरिश्चंद्र तुकाराम गावंढे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा जवळपास 46 हजार 200 रुपयाचा ऐवज लंपास केला आहे.

पेठ पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा करून गुन्हा दाखल केला असून हवालदार भूसारे अधिक तपास करीत आहेत.