'लाल वादळ' इगतपुरीकडे रवाना; आजची बैठक रद्द

'लाल वादळ' इगतपुरीकडे रवाना; आजची बैठक रद्द

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या काही काळापासून बळीराजा संकटात आला आहे. घसरलेल्या कृषिमालाचे दर आणि अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, या परिस्थितीत सरकार वारंवार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असून सरकारला जागे करण्यासाठी विविध संघटनांनी एकत्र येत नाशिक जिल्ह्यातून विधानभवनावर लाँग मार्च काढला आहे...

हा लाँग मार्च मुंबईपर्यंत धडकू नये म्हणून पालकमंत्री दादा भुसे यांच्या पुढाकारातून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. माता ही बैठक काही कारणास्तव रद्द करण्यात आली. त्यामुळे विल्होळीत थांबलेला लाँग मार्च आता इगतपुरीकडे रवाना झाला आहे. आता लाँग मार्च आंबे बहुला मार्गे वाडीवऱ्हे जात आहे..

उद्या बैठकीचे निमंत्रण दिले आहे. उद्या यावर तोडगा निघेल अशी राज्यकर्ते व मोर्चेकरी यांनी अपेक्षा आहे. जोपर्यंत यावर तोडगा निघणार नाही तोपर्यंत लाँग मार्च सुरूच राहणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

'लाल वादळ' इगतपुरीकडे रवाना; आजची बैठक रद्द
अभिनेते सयाजी शिंदेंवर मधमाशांचा हल्ला

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (Marxist Communist Party) किसान सभा आणि इतर समविचारी संघटनांनी हाती लाल झेंडे घेत हा लाँग मार्च काढला आहे. काल सहभागी आंदोलक शेतकऱ्यांनी निमाणी चौकात पोहोचल्यावर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, वांगे रस्त्यावर ओतून आपला संताप व्यक्त करत सरकारचा निषेध नोंदवला.

'लाल वादळ' इगतपुरीकडे रवाना; आजची बैठक रद्द
Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणीला सुरुवात, नीरज कौल यांच्या युक्तिवादाला सुरुवात
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com