लांब पल्ल्याच्या बसचा ओझर बसस्थानकाला 'टाटा'

लांब पल्ल्याच्या बसचा ओझर बसस्थानकाला 'टाटा'
प्रातिनिधिक फोटो

ओझर। Ozar

नाशिकहून (Nashik) सुटणार्‍या साध्या तसेच लांब पल्ल्याच्या एकूण जवळपास 360 बसेस रोज दहाव्या मैलापासून (Dahava Mail) सर्व्हिस रोडने ओझरमार्गे (Ozar) पुढे जातात. पैकी 55 ते 60 बसेस ओझरच्या नवीन बसस्थानकात (Ozar New Bus Stand) येतात.

लांब पल्ल्याच्या बसेस (Long Route Buses) बसस्थानकात न येताच टाटा करत पुढे मार्गस्थ होतात. प्रवाशांना लांब पल्ल्याच्या बसेससाठी सर्व्हिस रोडवरच (Service Road) थांबावे लागते. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून साध्या व लांब पल्ल्याच्या सर्वच बसेस नवीन स्थानकात आणाव्यात अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

लॉकडाऊनचे नियम शिथिल (Lockdown rules relaxed) झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने (Maharashtra State Transport Board) पूर्ण क्षमतेने प्रवासी बसवाहतूक सुरू केल्यानंतर ओझरसह परिसरासाठी असलेल्या नवीन स्थानकात रोज सरासरी 55 ते 60 एसटी च्या साध्या बसेस नियमित येत आहेत. त्यात पिंपळगाव (Pimpalgoan), सटाणा (satana), मालेगाव (Malegoan), नांदगाव, मनमाड, नंदूरबार या गावांकडे जाणार्‍या प्रवाशांना बसची जास्त वेळ वाट बघावी लागत नाही. मात्र लासलगावकडे (Lasalgoan) जाणारी एकही बस स्थानकात येत नाही.

तसेच मालेगाव (जलद), धुळे, नंदुरबार, शिरपूर, जळगाव, भुसावळ, अमळनेर, चोपडासह इतर ठिकाणी जाणार्‍या सर्व लांब पल्ल्याच्या बसेसचे चालक-वाहक बस स्थानकात न आणता सर्व्हिस रोडवर गडाख कॉर्नरसमोर किंवा नवीन स्थानकासमोर थांबवून प्रवाशांना उतरवून देतात व रस्त्यावर थांबलेल्या प्रवाशांना बसमध्ये घेतले जाते.

पिंपळगाव बाजूकडील जवळच्या किंवा लांब पल्ल्याच्या गावाला जाण्यासाठी प्रवाशांना बसस्थानकात जाण्यासाठी कुठलाही जवळचा रस्ता नसल्यामुळे गडाख कॉर्नरसमोरील बोगदामार्गे सर्व्हिस रोडने 1 किलोमीटर पायपीट करत जावे लागत आहे. नवीन स्थानकाचा वापर हा लांब पल्ल्याच्या बससाठीसुद्धा व्हावा अशी मागणी परिसरातील प्रवाशांकडून होत असून परिवहन महामंडळाने लांब पल्ल्याच्या बस ओझर स्थानकात थांबविण्यासाठी प्रयत्न करावे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com