नाशिक l Nashik (प्रतिनिधी)

संपुर्ण महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या आणि नाशिक जिल्हयाची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक मर्चंटस् को-ऑप. बँक लिमिटेड नाशिकच्या उपाध्यक्ष पदी हरीष लोढ़ा व जनसंपर्क संचालक पदी रजनी जातेगांवकर यांची आज झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत निवड करण्यात आली.

गेल्या तीन दशकांपासून सहकार आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या रजनी जातेगांवकर या २५ वर्षांपासून नामको बँकेच्या संचालक पदी निवडून येत आहेत.

संपुर्ण बँकिंग क्षेत्र आणि त्यातही सहकार क्षेत्र आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहे. नामको सभासदांना रोजच्या बँकिंग सेवे बरोबरच गुंतवणूक, इन्शुरन्स या सर्व सेवा एकाच छत्राखाली देण्याचा मानस या प्रसंगी जातेगांवकर यांनी बोलून दाखविला. जनसंपर्क संचालक या पदाच्या माध्यमातून बँक सेवा सभासदांच्या अधिक जवळ घेऊन जाण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.

सभासद आणि बँक प्रशासन ह्यांच्यातील संवाद अधिक सहज आणि सकारात्मक करण्यासाठी नामकोचे अध्यक्ष विजय साने, उपाध्यक्ष हरिष लोढा, ज्येष्ठ संचालक वसंतभाऊ गिते सोहनलाल भंडारी, हेमंत धात्रक, शिवदास ड़ागा, शोभा छाजेड अविनाश गोठी, प्रकाश दायमा, नरेंद्र पवार, गणेश गिते, रंजन ठाकरे, प्रशांत दिवे, अशोक सोनजे, सुभाष नहार, भानुदास चौधरी, प्रफुल संचेती, कांतिलाल जैन, महिन्द्र बुरड, संतोष धाडीवाल, अरुण मुनोत, आणि सेवकवर्ग या सर्वांच्या सोबतीने अधिक क्रियाशीलता आणण्यासाठी कटिबद्ध असणार असे त्यांनी निवड प्रसंगी नमूद केले.