लॉकडाऊनमुळे एक कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट 'लॉक'

जिल्ह्यात ७८ लाख वृक्ष लागवड यशस्वी
लॉकडाऊनमुळे एक कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट 'लॉक'

नाशिक । Nashik

तत्कालीन भाजप सरकारने पाच वर्षात 50 कोटी वृक्ष लागवडीचे ध्येय बाळगले होते. त्याअंतर्गत सन 2017 - 18 या वर्षात नाशिक जिल्ह्याला एक कोटी वृक्ष लागवडीचे टार्गेट देण्यात आले होते. वनविभाग, वनविकास महामंडळ, जिल्हापरिषद, कृषी विभाग यांसह 35 विभागांनी वृक्ष लागवड मोहीमेत सहभाग घेतला.

दिलेल्या उदिष्टांपैकी 78 लाख 48 हजार वृक्षांची जिल्ह्यात ठिकठिकाणी लागवड करण्यात आली. सन 2019 मध्ये एक कोटी 91 लाख वृक्ष लागवड झालेली आहे. त्यात एक कोटी 27 लाख वनविभागाने, पन्नास हजार महापालिका तर उर्वरित वृक्ष लागवड ही इतर सरकारी विभागांनी केली आहे.

मार्च 2020 पासून करोना संकटाची चाहूल सुरु झाली. खड्डे खोदण्याचा सामूहिक कामात समावेश होतो. त्यामुळे वृक्ष रोपणासाठी खड्डे खोदण्याचे काम करता आले नाही. तसेच रोपवाटिकेत देखील रोपे तयार करण्यात आली नाही. राज्यात सन 2019 मध्ये 33 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते.त्यात निम्मे उद्दीष्ट पूर्ण झाले.

50 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प

करोनाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला असून शासनाकडे निधी नसल्याने राज्यात सन 2020 पासून वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात आलेली नाही. ठाकरे सरकारने देखील पाच वर्षात 50 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला होता. त्यानूसार सन 2020 मध्ये राज्यभरात दहा कोटी वृक्षांचे रोपण केले जाणार होते. मात्र, करोना संकटामुळे वृक्ष रोपणासाठी खड्डे खोदणे व नर्सरीमध्ये रोपे तयार करणे ही प्राथमिक तयारी देखील करता आलेली नाही.

राज्यात महाविकास आघाडी सरकारने भाजप सरकारच्या वृक्ष लागवड मोहिमेचे नामांतर करुन त्यास ’ क्रांतीवीर वसंतराव नाईक हरीत अभियान ’ ही योजना सुरु केली. त्या नूसार प्रत्येक वर्षी राज्यात 10 कोटी म्हणजे पाच वर्षात 50 कोटी वृक्ष लागवड करुन महाराष्ट्र हिरवागार करण्याचे उदिष्ट दिले होते. पण करोना संकटामुळे ही मोहीम ‘लॉकडाऊन’ झाली आहे.

जिल्हा प्रशासनाला लागवडीचे उद्दिष्ट नाही!

वृक्ष रोपणासाठी दरवर्षी पूर्व तयारी म्हणून जानेवारी ते 31 मार्च या तीन महिन्यात खड्डे खोदले जातात. लागवडीसाठी कोट्यवधीच्या संख्येने शासकीय नर्सरीत रोपे तयार केली जातात. त्यानंतर प्रत्येक जिल्हा प्रशासनाला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले जाते. पण यंदा करोना संकटामुळे ही मोहीम यावर्षासाठी रद्द करण्यात आली आहे. वनमंत्र्यांकडून देखील जिल्हा प्रशासनाला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आलेले नाही.

नाशिक जिल्ह्यात सन 2017 - 18 या वर्षात जिल्ह्यात 78 लाख 48 हजार 282 वृक्षांची लागवड करण्यात आली. वनविभाग, वनविकास महामंडळ, जिल्हापरिषद, कृषी विभाग यांसह 35 विभागांनी वृक्ष लागवड मोहीमेत सहभाग घेतला.त्यापैकी 25 लाख 65 हजार रोपे संगोपनाअभावी कोमेजली आहेत. एक रोप लागवडीसाठी साधारणत: 50 ते 55 रुपये इतका खर्च येतो. मृत झालेल्या रोपांची संख्या बघता वृक्ष लागवडीसाठी झालेला साडेबारा कोटींचा खर्च पाण्यात गेला आहे.

एकूण वृक्ष लागवडीपैकी फक्त 67 टक्के वृक्षच तग धरु शकली.

25 लाख वृक्षांनी टाकली मान

गतवर्षी एकूण लावण्यात आलेल्या वृक्षांपैकी फक्त 52 लाख 83 हजार वृक्षच तग धरु शकली आहेत. संगोपन व दुर्लक्षामुळे तब्बल 25 लाख 65 हजार वृक्षांनी मान टाकल्याचे आकडेवारीरुन समोर येत आहे.

पाण्याची कमतरता व दुष्काळामुळे अनेक ठिकाणी लावण्यात आलेली वृक्ष जळाली. तर, काही ठिकाणी स्थानिकाकडून शेतीसाठी वृक्षांना वणवा लावला जातो. मानवनिर्मित वणव्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात वृक्ष जाळण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत.

मोजणीलाही ब्रेक

प्रत्येक वर्षी 31 ऑक्टोबर आणि 31 मे ला वृक्षांची मोजणी केली जाते केली जाते.मात्र, कोविड मुळे सन 2020 पासून मोजणी झालेली नाही.

Related Stories

No stories found.