दुधाच्या भावात पुन्हा घसरण

अंशतः लॉकडाऊनचा फटका
दुधाच्या भावात पुन्हा घसरण

जुने नाशिक | Nashik

लॉक डाऊन व करोनाच्या पार्श्वभूमीवर मेडिकल तसेच अत्यावश्यक सेवेची दुकानेच सुरू ठेवण्याची परवानगी असल्यामुळे दुधापासून तयार होणारे खाद्यपदार्थ तसेच मिठाई आदींची दुकाने बंद आहे.

यामुळे बाजारातुन दुधाची उचल होत नाही. यामुळे दुधाच्या भावात पुन्हा घसरण झाली आहे. सुमारे 80 रुपये पर्यंत विक्री विक्री झालेला दूध सध्या 50 रुपये पर्यंत विक्री होत.

मागील पंधरा दिवसात सुमारे तीस रुपये घट झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. दुसरीकडे गोठ्यासाठी लागणारा खर्च मात्र वाढत आहे. यामुळे दूध व्यापारी आर्थिक संकटात देखील सापडले आहे. सध्या महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ब्रेक दि चेन मोहीम सुरू करून कडक निर्बंध लागू केले आहेत, याची तयारी झाल्यापासून परप्रांतीय मजुरांनी आपापल्या गावी जाण्यास सुरुवात केली होती, तर सध्या अगदी कमी संख्येने मजुरांची उपस्थिती आहेत. कामगारांची संख्या घटल्याने जास्त पैसे देऊन बाहेरून कामगार आणावे लागत आहे.

तर दुसरीकडे बाजारात दुधाला भाव मिळत नाही, अशी अवस्था सध्या व्यापाऱ्यांची झाली आहे. काही दिवसांपूर्वी 80 रुपये पर्यंत विक्री होणारा दूध सध्या 50 ते 55 रुपये प्रति लिटर प्रमाणे विक्री होत आहे. नागरिकांचे यामुळे फायदा होत असला तरी व्यापाऱ्यांचे मात्र नुकसानच असल्याची चर्चा आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com