नाही तर पुन्हा एकदा कडक निर्बंध : पालकमंत्री भुजबळ

नाशिककरांनो नियम पाळा
पालकमंत्री छगन भुजबळ
पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक | Nashik

करोनाची रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर आपल्याला परत एकदा अतिशय कडक निर्बंध टाकावे लागतील असा इशारा देत कडक निर्बंध टाकले गेले तर किती त्रास होतो...

याची कल्पना आपल्याला सगळ्यांना असल्याने नाशिककरांनो सर्व नियमांचं काटेकोर पणे पालन करा, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात करोना आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधत असताना ते बोलत होते.करोना रोग हा भयानक आहे. आपल्याला तीव्रता समजली पण गांभिर्य कमी झाले.

विनामास्क गिर्‍हाईकांसोबत व्यवहार करणाऱ्या दुकानदाराचे दुकानच बंद करण्याची कडक कारवाई केली. कारवाई केल्याशिवाय लोकांना कळणार नाही. जिल्ह्यात पोस्ट कोविड सेंटर उभारणार अाहे. कांद्या प्रश्नाबाबत उद्या शरद पवारांची भेट घेणार आहे.

केंद्र शासनाने निर्यातबंदी केली आहे. महाराष्ट्र सरकारकडून केंद्रीय मंत्र्यांकडे तोडगा काढण्याबाबत विनंती केली जाईल असे त्यांनी सांगितले.

केंद्र शासनाने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत लवकर निर्णय घ्यावा. ते परत गेले तर त्यांच्या मनात जखम कायम राहील. त्यांना शांत करणे साकारात्क निर्णय घेणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केले.ओबीसी नेत्यांमध्ये दोन गट वगैरे काहीही नाही.

काही लोक म्हणतात शरद पवार साहेब मराठयांविरोधात आहे आरक्षण देत नाही.काही म्हणतात ओबीसी विरोधात आहे. पण पवारसाहेब सत्यशोधक घरातील असून पण पवार साहेब सर्व घटकांचा विचार करत असतात.

हवा बदलली

खडसे भाजपमधील एक नंबरचे नेते होते. त्यांनी भाजप सोडले इकडे आले. जयसिंगराव गायकवाड इकडे आले. परवा पदवीधर निकाल लागला, पुणे नागपूर बालेकिल्ला गेला. भाजपचा सर्व आमदारांनी धडा घेतला आहे. आता हवा बदलली असल्याचा टोला त्यांनी प्रविण दरेकर यांना लगावला.

भाजपच्या लोकप्रतिनिधींना आता भीती आहे. खडसेंच्या पाऊलावर पाऊल ठेवून आता इतर लोकप्रतिनिधी येऊ नये असे भाजपने बघावे व आपला पक्ष सांभाळावा असा टोला त्यांनी लगावला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com