ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप

ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप

नामपूर । वार्ताहर Nampur

विकास करण्यासाठी Devlopment works ग्रामपंचायत प्रशासन Grampanchayt सपशेल अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ बागलाण तालक्यातील Baglan Taluka तळवाडे भामेर Talwade Bhamer येथील तरूण-ग्रामस्थांनी एकत्र येत ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप ठोकत आपला संताप प्रकट केला.

बागलाण तालुक्यात तळवाडे गावाची ओळख जागृत गाव म्हणून केली जाते. मात्र अलीकडच्या काळात या गावाचा विकास पूर्णता थांबला आहे. शासनाच्या ग्रामविकासाच्या संकल्पनेला मूठमाती देण्याचे काम ग्रामपंचायत प्रशासनातर्फे केले जात असल्याने गावातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित राहत आहेत. गावासाठी आमदार व खासदार निधी नियोजन मंडळाकडून आणण्यास ग्रामपंचायत कमी पडत असल्याने विकासकामे रखडली आहेत.

वित्त आयोगाच्या पाईपलाईन व काँक्रीटीकरण कामात घोटाळा होऊन कामाची गुणवत्ता घसरली आहे. गोरगरीब जनतेला रस्ता, वीज, पाणी घरकुल मिळत नाहीत. सरपंच व ग्रामसेवक यांचा मनमानी पध्दतीने कारभार सुरू असून ते गावात राहत नसल्याचा आरोप ग्रामस्थांतर्फे करण्यात आला आहे.

ग्रामस्थांतर्फे कामासंदर्भात केल्या जात असलेल्या तक्रारीला केराची टोपली दाखवली जात आहे.गाव हे डोंगराच्या शेजारी वसलेले असल्यामुळे येथे बिबट्या, वानर, रानडुक्कर यांचे थैमान वाढले असल्याने ग्रामस्थांना शेती करणे अवघड झाले आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाला याबाबत उपाययोजना करण्यासाठी अनेक वेळा सांगूनही काहीच कार्यवाही होत नसल्यामुळे ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांना धडा शिकवण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन ग्रामपंचायतीला कुलूप लावण्याचा निर्णय घेतला असल्याची संतप्त प्रतिक्रिया योगेश गायकवाड, दिनेश गायकवाड, राजेंद्र गायकवाड, गोलू गायकवाड, राहुल गायकवाडसह ग्रामस्थांनी दिली आहे.

दरम्यान याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता सरपंच गावावर नसल्यामुळे माहिती मिळू शकली नाही. या घटनेबाबत ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले असून वरिष्ठ अधिकारी जोपर्यंत ग्रामपंचायतीच्या मनमानी कामकाजावर कार्यवाही करीत नाही तोपर्यंत कुलूप न उघडण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

सरपंचाव्दारे विकासाची ग्वाही दिली जाते. मात्र गावाचा विकास पुर्णत: ठप्प झाल्याने त्यांनी ग्रामस्थांची दिशाभुल केली आहे. सरपंच व ग्रामसेवक यांनी गाव विकासाकडे पुर्णत: दुर्लक्ष केले आहे. जनतेच्या तक्रारींची दखल सुध्दा घेतली जात नसल्याने त्यांना पदावर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही. त्यामुळे न्यायाच्या अपेक्षने ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप लावण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत गावकर्‍यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, अशी प्रतिक्रिया भाजपाचे ज्येष्ठनेते शाम गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com