जास्तीत जास्त शेतकर्‍यांना कर्जपुरवठा करावा

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे आवाहन
जास्तीत जास्त शेतकर्‍यांना कर्जपुरवठा करावा

ओझे । वार्ताहर

‘जिल्हा बँक ( District Bank ) ही सर्वसामान्य शेतकर्‍यांची जीवनवाहिनी असून बँकेतर्फे जिल्ह्यात सर्वाधिक कृषी कर्ज वाटप होत असले तरी अजूनही अनेक शेतकरी कृषी कर्जापासून वंचित आहे. तरी विविध सोसायट्यांच्या अनिष्ट तफावत कमी करत जास्तीत जास्त शेतकर्‍यांना कर्जपुरवठा करावा’ असे आवाहन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ ( Assembly Vice President Narhari Jhirwal )यांनी केले.

मुंबई विधानभवन येथे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा बँकेच्या कर्जवाटप, वसुली व टीडीएस कपात आदी अडचणींबाबत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या खाजगी सचिव संतोष पाटील यांचे उपस्थितीत बैठक झाली त्यावेळी झिरवाळ बोलत होते.

बैठकीस आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार जयंत जाधव, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, माजी जि. प. उपाध्यक्ष प्रकाश वडजे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, बाबूशेठ बागमार, जिल्हा बँकेचे प्रशासक एम. ए. अरीफ, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे, सचिव मुकेश भोगे, आंबेदिंडोरी उपसरपंच सुभाष वाघ, राजेंद्र परदेशी, गोपाळ धूम आदी उपस्थित होते.

यावेळी सचिव पाटील यांनी बँक banks उर्जितावस्थेत आणण्यासाठी विविध उपाय सुचवत प्रशासक यांना त्यासाठी सर्व कर्मचार्‍यांना जबाबदार्‍या द्याव्या असे सांगितले.

नाशिक जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकेपेक्षा जिल्हा बँकेने एवढ्या अडचणीच्या काळातही अनेक सोसायट्यांमधील अनिष्ट तफावत दूर होत सोसायट्यांचे कर्जवाटप सुरू झाले आहे. बँक वाचविण्याच्या दृष्टीने चांगली वाटचाल सुरू आहे. जसे ‘ब’ वर्ग मधील काही सोसायट्याची अनिष्ट तफावत दूर झाली तसाच प्रयत्न ‘क’ वर्गासाठी करावा व जास्तीत जास्त कर्जवाटप करावे.

यावेळी गणपतराव पाटील, माजी आमदार जयंत जाधव, प्रकाश वडजे, रंजन ठाकरे,बाबूशेठ बागमार यांनी विविध सूचना मांडल्या. त्यात सर्व सोसायट्यांचे क्रमपत्र बनवावे कर्जवाटपाची तयारी करावी, अनिष्ट तफावत 50 टक्के कमी करावी,कर्जवसुली करताना जे खातेदार कुटुंबातील व्यक्तीच्या ठेवी, खात्यातील रक्कम संमती घेऊन वर्ग करत असतील तर करून घ्याव्या. त्यासाठी टक्केवारीची अट ठेवू नये, शेतकरी अत्यंत अडचणीतून जात असताना कर्जवसुली मोहिमेत शेतकर्‍यांना त्रास देऊ नये, लिलाव थांबवावे, वनटाईम सेटलमेंट योजना प्रभावीपणे राबवावी, त्यासाठी इतर बँक ज्याप्रमाणे धोरण राबवते ते राबवावे आदी सूचना करण्यात आल्या.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com