सभासदांना कर्जवाटप करणार

सभासदांना कर्जवाटप करणार

सिन्नर । वार्ताहर Sinnar

श्री सूर्यभानजी गडाख सेकंडरी टीचर्स सोसायटी (Shri Suryabhanji Gadakh Secondary Teachers Society) सभासदांना 29 लाख रुपयांचे कर्जवाटप (Loan disbursement) करणार असल्याची घोषणा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दौलतराव मोगल यांनी केली.

संस्थेची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (Annual General Meeting) एस. जी. पब्लिक स्कूल येथे चेअरमन रावसाहेब तांबे यांच्या अध्यक्षतेाखाली ऑनलाईन (Online) पार पडली. यावेळी व्यासपीठावर माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे (Board of Secondary Public Education) अध्यक्ष अण्णासहेब गडाख, सचिव राजेश गडाख, सोसायटीचे संस्थापक दौलतराव मोगल, उपाध्यक्ष विलास पाटील, कार्यवाह नानासाहेब खुळे,

संचालक माधव शिंदे, बाळू धूम, रामेश्वर मोगल, बाबासाहेब डुंबरे, चंद्रभान उगले, राजेंद्र मिठे, एकनाथ खैरनार, बापू चतुर, मुख्याध्यापक रघुनाथ एरंडे, उदय कुदळे,भागवत आरोटे, किशोर जाधव, परशराम कथले व्यवस्थापक वसंत निरगुडे,संतोष भालेराव, वैभव गडाख आदी उपस्थित होते.सरस्वती पूजनानंतर नानासाहेब गडाख यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कामकाजास सुरुवात झाली. नानासाहेब खुळे यांनी विविध विषयांचे वाचन केले. त्यास सर्व सभासदांनी मंजुरी दिली.

संस्थेस लेखापरीक्षणात सातत्याने ऑडिट ‘अ ’वर्ग मिळत असल्याने त्याचे मुख्य श्रेय हे संस्थापक अध्यक्ष दौलतराव मोगल (Founder President Daulatrao Mughal) यांना जात असल्याचे खुळे यांनी यावेळी सांगितले. कर्ज मर्यादा वाढविण्याची घोषणा केल्यानंतर खुळे यांनी तिचे स्वरूप स्पष्ट केले. 35 हजार पगारापुढे 10 लाख, 45 हजारापुढे 13 लाख, 55 हजारापुढे 16 लाख, 70 हजाराच्यापुढे 20 लाख व 90 हजराच्यापुढे वेतन असल्यास 55 लाख रुपये दिर्घ मुदतीचे कर्ज वाटप करण्यात येणार आहे.

याव्यतिरिक्त 4 लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज (Educational loan) व आकस्मिक 50 हजार असे एकूण 29 लाख 50 हजार कर्ज मर्यादा वाढणार आहे. संस्थेची देवपूर येथे शाखा असून येथूनच सर्व कारभार पाहिला जातो. बहुतांश शिक्षक (Teachers) वर्ग हा सिन्नरला राहत आहे. त्यामुळे त्यांना शहरालगत शाखा उपलब्ध व्हावी म्हणून माध्यामिक लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख यांनी जागा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली.

यावेळी सभेसाठी शिवाजी गाडेकर, विलास सातपुते, बाळासाहेब काळोखे, चंद्रकला साळुंखे, अतुल पाटणे, बाळासाहेब गडाख, राजू कांबळे हे प्रत्यक्ष तर सुनिल गडाख, सलिम चौधरी, शंकर गुरूळे, रविंद्र कोकाटे, मंगल बोरनारे, रमेश रौंदळ, गणेश मालपाणी ऑनलाईन पद्धतीने हजर होते

6.5 टक्क्याने लाभांश वाटप होणार

सभासदांच्या भाग भांडवलावर संस्थेला झालेल्या नफ्याच्या प्रमाणानुसार सभासदांना लाभांश वाटप करण्याचे यावेळी ठरले. संस्थेला 33 लाख 46 हजार 957 रुपये इतका नफा झाला. त्यातून रिझर्व फंड लाभांश समीकरण निधी, धर्मादाय निधी, बुडीत कर्ज निर्मूलन निधी, कर्मचारी बोनस वजा जाता उर्वरित 23 लाख 9 हजार 655 रुपये निधीवर 6.5 टक्के दराने सभासदांना लाभांश वाटपाचा निर्णय झाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com