अहिराणी भाषेचा साहित्यीकांनी अभिमान बाळगावा

काव्य संमेलनात कवी अ‍ॅड. मुंजवाडकर यांचे प्रतिपादन
अहिराणी भाषेचा साहित्यीकांनी अभिमान बाळगावा

सटाणा । प्रतिनिधी Satana

शब्द रत्नांचा अविष्कार जोपासतांना अहिराणी बोली (Ahirani dialects) भाषेचा अभिमान बाळगून साहित्यिकांनी शब्दांवर प्रेम करावे. शब्दांना भाषा (Language), जात (caste), पंथ, प्रांत व धर्म (Religion) यापलीकडे नेण्याची किमया साहित्यिकांनी केल्यास अहिराणी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होईल, असे प्रतिपादन साहित्यायन संस्थेचे सचिव, कवी अ‍ॅड. सोमदत्त मुंजवाडकर (Adv. Somdatta Munjwadkar) यांनी येथे केले.

नेहरू युवा केंद्र (Nehru Youth Center) व साहित्यायन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित काव्य संमेलनाच्या (Poetry convention) अध्यक्षस्थानावरून अ‍ॅड. मुंजवाडकर बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते व ज्येष्ठ साहित्यिक अजय बिरारी (Actor and veteran writer Ajay Birari), कवि देवदत्त बोरसे, शैलेश चव्हाण, विवेक पाटील, काशीनाथ डोईफोडे, आबा आहेर, प्रा. शं.क. कापडणीस आदि उपस्थित होते.

अजय बिरारी यांच्या प्रेम आणि क्रिकेट ही अहिराणी विनोदी कविता व गझलेने काव्य मैफलीची सुरुवात झाली. कवी देवदत्त बोरसे, समाधान भामरे, शैलेश चव्हाण, कवियित्री माधुरी अमृतकार, अ‍ॅड. मुंजवाडकर, प्रा. कापडणीस, पूनम अंधारे, रोहिणी गायकवाड यांच्यासह अनेक कवी, कवियित्रींनी विविध विषयांवरील उत्कृष्ट काव्यरचना सादर करून श्रोत्यांची दाद मिळवली.

आबा आहेर, दादा खरे, कैलास चौधरी, माणिकराव गोडसे यांच्या काव्य रचनेने सर्वांना मंत्रमुग्ध केले. यावेळी बाळासाहेब गिरी, काशिनाथ डोईफोडे, सोपान खैरनार, सौरभ आहेर, नरेंद्र सोनवणे, अमित शेवाळे, यश सोनार, ए.एस. भामरे आदींसह जिल्ह्यातुन आलेल्या कवींनी त्यांच्या रचना सादर केल्या. ब्राह्मणपाडे येथील युवाशक्ती फाऊंडेशन यांनी संमेलनास सहकार्य केले. यावेळी करंजाड तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश वाघ, समाधान भामरे आदींसह साहित्यप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते. धनंजय अहिरे यांनी सूत्रसंचालन तर समाधान भामरे यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com