राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत कोट्यावधींचा मद्य साठा जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत कोट्यावधींचा मद्य साठा जप्त

शिरवाडे वाकद | प्रतिनिधी

आज दि.२१ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला गोवा निर्मित विदेशी मद्याचा वाहतूक करणारा कंटेनर राज्य उत्पादन शुल्क विभाग येवला युनिटने पाठलाग करून विंचुर ता.निफाड येथे ताब्यात घेतला.

या कंटेनरमध्ये गोवा बनावटीचे रॉयल ब्ल्यू व्हिस्की १८० मिली क्षमतेच्या बाटल्या असलेले सुमारे १ कोटी ९ लाख ५३ हजार रुपये किमतीचे अकराशे बॉक्स आढळून आले आहेत. संशयित कैलास पांडू लष्कर वय ३३ रा.धुळे संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. या संशयित आरोपीस न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, संचालक सुनील चव्हाण, विभागीय उपायुक्त डॉ.बी.एच तडवी, नाशिक अधीक्षक शशिकांत गर्जे, उपअधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क येवला विभागचे निरीक्षक विठ्ठल चौरे, दुय्यम निरीक्षक संजय वाकचौरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक, शिपाई अवधूत पाटील संतोष मुंडे ,विठ्ठल हाके, अमन तडवी, मुकेश निंबेकर यांनी ही कारवाई केली असून या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक संजय वाकचौरे हे करीत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com