मोहदरी शिवारात लाखोंचा मद्यसाठा जप्त

मोहदरी शिवारात लाखोंचा मद्यसाठा जप्त

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

नाशिक-पुणे महामार्गावर (Nashik-Pune highway) मोहदरी (Mohdari) शिवारात राज्य उत्पादन शुल्क (State Excise Duty) नाशिक विभागाच्या (Nashik Division) पथकाने गस्त घालत असतांना गोवा राज्यातुन आलेला अवैध दारूसाठा (Illegal storage of liquor) व वाहतूक करणारे तीन वाहने असा 45 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त (Confiscation of goods) केला आला.

नाशिक उत्पादन शुल्क विभागाच्या (Nashik Excise Division) भरारी पथकाने सिन्नर - नाशिक महामार्गावर मोहदरी शिवारात सिन्नर पोलिस ठाण्याच्या (Sinnar Police Station) हद्दीत मध्यरात्री गस्त घालत असताना सुर्या हाँटेलच्या बाजुला आयशर क्र एम. एच.46-2398 या गाडीची तपासणी केली असता या गाडीत विदेशी कंपनीच्या केवळ गोवा राज्यात विक्री असलेल्या 750 मि.ली.च्या बिल स्पेशल व्हीस्कीच्या 3600 सीलबंद बाटल्या (300 बाँक्स) सदरच्या वाहनात आढळून आल्या.

तसेच यावेळी सदर टेंम्पोच्या पुढे देखरेख करणारी हुंदाईची क्रेटा क्र.एम. एच. 07/ ऐ. जी. 9199 तर पाठीमागे असलेली स्विप्ट डिझायर क्र. एम. एच. 16 / सी. व्ही. 3192 या दोन्ही वाहने या पथकाने ताब्यात घेतले. यावेळी दारूची अवैध वाहतूक (Illegal traffic of liquor) करतांना नरेंद्र उर्फ नरेश राजेंद्रसिंग रोतेला (अहमदनगर), नारायण भगवान गिरी (सातारा), सुनिल रामचंद्र कांबळे (पुणे),अजय सुर्यकांत कवठणकर (सिंधुदुर्ग ), रविंद्र दत्तात्रय काशेगावकर (पुणे), जतिन गुरूदास गावडे(सिंधुदुर्ग), सतिष संतोष कळगुरकर (सिंधुदुर्ग),

सुभाष सखाराम गोदडे (अहमदनगर) अशोक बाळासाहेब गाडे (अ.नगर) अशा नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांकडून अवैध दारू व वाहतूक करणारे तसेच देखरेख करणारे असे तीन वाहनांसह 45 लाख 10 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई नाशिक उत्पादन शुल्कचे अधिक्षक शशिकांत गर्जे, प्रभारी उपधिक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक क्रमांक 1 चे निरीक्षक जयराम जाखेरे, दुय्यम निरीक्षक रोहित केरीपाळे यांनी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com