लायन्स तर्फे ब्राह्मणवाडे येथील विद्यार्थ्यांना मोबाईल वाटप

लायन्स तर्फे ब्राह्मणवाडे येथील विद्यार्थ्यांना मोबाईल वाटप
लायन्स तर्फे ब्राह्मणवाडे येथील विद्यार्थ्यांना मोबाईल वाटप

नवीन नाशिक l New Nashik (प्रतिनिधी) :

लायन्स क्लब ऑफ नासिक स्टारने त्रंबकेश्वर गावातील ब्राह्मणवाडे येथील माध्यमिक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना मोबाईल फोन भेट दिले.

सध्या शाळा, महाविद्यालय शैक्षणिक संस्था अजूनही बंद आहेत शहरी भागात ऑनलाईन शिक्षण चालू आहे पण दुर्गम भागात असलेले विद्यार्थी अजूनही या सुविधेपासून वंचित आहेत.

इयत्ता १०वी सारख्या महत्वाच्या अशा टप्प्यावर ब्राम्हण वाडे शाळेतील विद्यार्थी अभ्यासापासून वंचित राहू नये, त्यांना शिक्षकांचे मार्गदर्शन मिळावे या हेतूने लायन्स क्लब ऑफ नासिक स्टार यांनी "लोन ए फोन" या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना ऑनलाईनची सुविधा असलेले सर्व सोयींनी युक्त असे फोन उपलब्ध करून दिले.

सुमारे वीस फोन जमा करून त्यात आवश्यक ते एप्लिकेशन्स टाकून पालकांच्या नावाने नवीन सिम कार्ड बनवून हे फोन शाळेतील शिक्षकांना सुपूर्त केले.

नाशिक शहरातील विविध नामवंत शिक्षकांचे मार्गदर्शन या दहावीतील मुलांना देण्याचा मानस लायन्स क्लब ऑफ नासिक स्टारच्या अध्यक्षा डॉ. नुपुरा प्रभू , डॉ. अमित प्रभू यांनी बोलून दाखवला.

याप्रसंगी स्टार कम्युनिकेशन नासिक येथील झुझेर दोराजीवाला यांनी जिओ सिम कार्ड उपलब्ध करून दिले.

तर रेवा इन्फोटेक या संस्थेने इतर काही फोन रिपेअर करून देण्यास सहकार्य केले. यावेळी अश्विनी बाग यांनी शिक्षकांचा परिचय करून दिला.

कार्यक्रमाच्या याप्रसंगी अभय बाग, ललित पवार, नेत्रा पवार, अमित पाटील, पल्लवी पाटील, अथर्व बाग, अक्षदा बाग, ब्राह्मण वाडे येथील गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव सारिका कलंत्री यांनी तर आभार शाळेच्या शिक्षिका मीनल राहुडे यांनी मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com