वीज पडून शेतकर्‍यासह दोन बैल ठार

वीज पडून शेतकर्‍यासह दोन बैल ठार

नांदगाव,मालेगाव । प्रतिनिधी Nandgaon, Malegaon

नांदगाव तालुक्यातील ( Nandgaon Taluka ) तळवाडे ( Talwade )येथे सायंंकाळी सहाच्या सुमारास झालेल्या वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पावसात अंगावर वीज (Lightning) पडून शेतकर्‍यासह दोन बैल ठार झाल्याची घटना काल घडली .तसेच मालेगाव तालुक्यातील निमगाव व दाभाडी परिसरातही मान्सूनपूर्व पावसाने ( Rain )वादळीवार्‍यासह जोरदार हजेरी लावली.

सुमारे अर्धा ते पाऊणतास बरसलेल्या पावसामुळे दाभाडी, पिंपळगाव, दुंधे, तळवाडे परिसरात डाळींबाची झाडे उन्मळून पडली तर काढणी करून उघड्यावर

ठेवलेला कांदा अचानक आलेल्या पावसात भिजून शेतकर्‍यांचे नुकसान झाले. मोसमखोर्‍यासह माळमाथा भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मात्र कुठेही पावसाची हजेरी लागली नसल्याचे वृत्त आहे.

नांदगाव तालुक्यातील तळवाडे शिवारात सायंकाळी सहाच्या सुमारास जोरदार वादळी वार्‍यासह पावसाला सुरुवात झाली याच दरम्यान तळवाडे येथील शेतकरी शांताराम सखाहरी निकम (60) हे भरपावसात आपली बैलजोडी घेऊन घराकडे निघाले असताना रस्त्यातच त्यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा व दोन बैलांचा जागेवरच मृत्यू झाला.

यामुळे तळवाडे गावावर शोककळा पसरली आहे. शांताराम सखाहरी निकम यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com