कधी ऊन, कधी पावसाच्या सरी तर कधी ढगाळ वातावरण..!

कधी ऊन, कधी पावसाच्या सरी तर कधी ढगाळ वातावरण..!

नाशिक | Nashik

तौक्ते चा परिणाम नाशिक शहरासह जिल्ह्यात जाणवत असून पावसाचा जोर कमी झाला असला तरी कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण तर कधी पावसाच्या सरी अनुभवायला मिळत आहेत.

दरम्यान अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा फटका शहरासह जिल्ह्याला बसला. अनेक ठिकाणी घरांच्या पडझडी, फळबागांचे नुकसान झाले. त्यामुळे दोन दिवस वीजपुरवठा देखील खंडित होता. अशातच काहीसे वातावरण निवळल्यानंतर आता कधी ऊन, कधी ढग तर कधी पावसाच्या सरी अधून मधून येताना नाशिककर अनुभवत आहेत.

रविवार सायंकाळ पासून तौक्ते साग परिणाम जाणवायला सुरवात झाली होती. सुरवातीला सोसाट्याचा वारा, त्यानंतर जोरदार पावसाचे आगमन यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. सोमवार मंगळवार देखील यातच गेले. त्यांनतर आज बुधवार रोजी वातावरणात बदल झाल्याचे दिसून आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com