साडेसात लाख रूग्णांना जीवदान

'१०८' रूग्णवाहिका करोना काळातही ठरली जीवनदायीनी
साडेसात लाख रूग्णांना जीवदान

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोना रूग्णांच्या सेवेसाठी आरोग्य, पोलीस यांच्याबरोबरीने अ‍ॅम्बुलन्स सेवा सज्ज आहे.

करोना काळातही धोका पत्करून १०८ रूग्णवाहिकांनी आतापर्यंत राज्यभरातील ७ लाख ७५ हजारपेक्षा अधिक रूग्णांना रूग्णांलयांमध्ये पोहोच करत जीवदान दिले आहे.

यात नाशिक जिल्ह्यातील २२ हजार रूग्णांचा समावेश आहे. तर राज्यभरातील २ लाख ७० हजार करोना रूग्णांचाही समावेश आहे. मार्चपासून जगभरात करोनाचा कहर सुरू झाल्यानंतर राज्य तसेच जिल्ह्यात करोना रूग्णांच्या सेवेसाठी आरोग्य, पोलीस यांच्याबरोबरीने अ‍ॅम्बुलन्स सेवा सज्ज होती.

राज्यात बीव्हीजी ग्रुपच्या सहकार्याने १०८ या टोल फ्री क्रमांकाने विनामुल्य अ‍ॅम्बुलन्स सेवा सुरू आहे. जानेवारी ते ऑगस्ट पर्यंत राज्यभरातील ७ लाख ७५ हजार २३० रूग्णांची वाहतूक १०८ अ‍ॅम्बुलन्सने केली. यामध्ये २ लाख ७० हजार ४०२ करोना रूग्णांचा समावेश आहे.

राज्यभरात वाहतूक करण्यात आलेल्या रूग्णांमध्ये सर्वाधिक ३ लाख ८७ हजार ८१९ किरकोळ आजारांसाठी दाखल झालेले रूग्णांचा समावेश आहे. त्या खालोखाल ८२ हजार ५१८ बाळंतपणासाठी दाखल करण्यात आलेल्या गर्भधारक महिलांचा समावेश आहे. तर २३ हजार ३८६ वाहनांच्या अपघातातील जखमी रूग्ण आहेत. तसेच ३३८ आत्महत्येचा प्रयत्न केलेल्यांचा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यात १०८ च्या ४७ अ‍ॅबुलन्स सर्व तालुका तसेच गाव पातळीवर कार्यरत आहेत. जानेवारी ते आतापर्यंत या आठ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील विविध प्रकारच्या २३ हजार ६१४ रूग्णांची वाहतूक केली आहे. करोनाच्या कालावधीत मार्च ते ऑगस्ट २०२० या कालावधीत प्रत्येक करोना रूग्ण वाहतुकीसाठी १०८ अ‍ॅबुलन्सचा वापर करण्यात आला. यामध्ये आतापर्यत २१ हजार १४१ रूग्णांची वाहतूक करण्यात आली.

आठ महिन्यात अशी मदत

रूग्ण संख्या

किरकोळ आजार ३ लाख ८७ हजार ८१९

गर्भधारक महिला ८२ हजार ५१८

औषोधपचार ४९ हजार २०४

वाहन अपघात २३ हजार ३६८

करोना रूग्ण २१ हजार ४०२

उंचावरून पडलेले ८ हजार ९३४

भाजलेले १ हजार ०३१

हृदयरोग ४७३

विजेचा धक्का ३६२

आत्महत्येचा प्रयत्न ३३८

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com