दृष्टीकोन बदलला तर आयुष्य सुंदर : सारंग

दृष्टीकोन बदलला तर आयुष्य सुंदर : सारंग

पिंपळगाव ब.। प्रतिनिधी | Pimpalgaon Bsawant

विद्यार्थीनिंना (students) नेहमी प्रश्न पडले पाहिजे तरच त्यांचे व्यक्तिमत्त्व (Personality) फुलेल. आपले अस्तित्त्व सिद्ध करण्यासाठी संघर्ष केलाच पाहिजे. जीवनाकडे सकारात्मकतेने बघा आपला दृष्टीकोन बदलला तरच संपूर्ण आयुष्य सुंदर बनेल (Life will be beautiful) असे प्रतिपादन रेडिओ विश्वास (Radio Vishwas) च्या निवेदक स्नेहल सारंग (Snehal Sarang) यांनी केले आहे

येथील काकासाहेब वाघ महाविद्यालयात (Kakasaheb Wagh College) सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘विद्यार्थिनी मंच’ चे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात स्नेहल सारंग बोलत होत्या. यावेळी सारंग यांनी त्यांच्या जीवनात भेटलेल्या काही स्त्रिया ज्यांनी संघर्ष करत आपले अस्तित्व सिद्ध केले अशा सीताबाई गायकवाड, भागीरथीबाई आणि हिरुमावशी या तीन स्त्रियांची उदाहरणे दिली.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिलीप शिंदे म्हणाले की, या मंचाच्या माध्यमातून विद्यार्थिनी स्वावलंबी बनून त्यांचे व्यक्तिमत्व फुलले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत विद्यार्थिनीसाठी महाविद्यालयातून अनेक उपक्रम राबविले जात आहे. विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे.

अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद या मंचाच्या माध्यमातून निर्माण झाली पाहिजे असे मत मांडले. प्रास्ताविक विद्यार्थिनी मंच प्रमुख प्रा.चित्ररेखा जोंधळे यांनी केले. त्यांनी मंचाच्या माध्यमातून राबविलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा.ढगे, डॉ.एस.एन. अहिरे, प्रा.सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.शोभा डहाळे यांनी केले. परिचय डॉ.प्रणाली जाधव यांनी करून दिला तर डॉ.छाया भोज यांनी आभार मानले. याप्रसंगी प्राध्यापक वृंद, कर्मचारी व महाविद्यालयीन विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com