अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे जळीत हत्याकांड प्रकरणी तिघांना जन्मठेप

अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे जळीत हत्याकांड प्रकरणी तिघांना जन्मठेप

मनमाड | प्रतिनिधी | Manmad

मालेगावचे (Malegaon) अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे (Yashwant Sonwane) जळीत हात्यकांडचा (Burning Massacre) आज निकाल लागला असून मालेगाव अप्पर जिल्हा सत्र न्यायलयाचे न्यायमूर्ती डी वाय गोंड (Justice DY Gond) यांनी तीन आरोपीना जन्मठेपेची (Life Imprisonment) शिक्षा ठोठावली आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, मच्छिंद्र सुरवडकर, राजू सिरसाट आणि अजय सोनवणे या तिघां आरोपीना कलम ३०२ अंतर्गत आजीवन करावास,३५३ अंतर्गत २ वर्षे आणि कलम ५०६ अंतर्गत ७ वर्षे शिक्षा (Punishment) आणि दोन हजार रुपये दंड केला आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला २५ जानेवारी २०११ रोजी अप्पर जिल्हाधिकारी सोनवणे मनमाड (Manmad) पासून जवळ असलेल्या इंधनाच्या अवैध (illegal fuel) अड्डयावर छापा मारण्यासाठी गेले असता इंधन माफियानी त्यांना जिवंत जाळून ठार मारले होते. या घटनेने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देश हादरला होता.

दरम्यान, या प्रकरणात मुख्य आरोपी पोपट शिंदे सोबत मच्छिंद्र सुरवडकर,राजू सिरसाट,अजय सोनवणे आणि कुणाल शिंदे असे पांच आरोपी होते त्यापैकी पोपट शिंदे यांचा मृत्यू झाला आहे तर कुणाल शिंदे हा त्यावेळी अल्पवयीन होता त्यामुळे त्याच्यावर बाल न्यायालयात (Juvenile Court) खटला सुरु आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com