अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापास जन्मठेप
नाशिक । Nashik
पोटच्या अल्पवयीन मुलीवर (minor girl) लैंगिक अत्याचार (Sexual harassment) करणाऱ्या नराधम बापास (father) न्यायालयाने (court) आजन्म जन्मठेप (Birth control) व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली (Sentenced) आहे...
याबाबत सविस्तर माहिती अशी की,पंचवटी पोलीस ठाण्याच्या (Panchavati Police Station) हद्दीत फुलेनगर परिसरातील (fulenagar area) एका नराधम बापाने (दि.९ एप्रिल २०२१) त्याची अल्पवयीन मुलगी घरात एकटी झोपली असल्याचा गैरफ़ायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पीडित मुलीने पंचवटी पोलीस ठाण्यात नराधम पित्या विरोधात गुन्हा दाखल (case filled) केला होता. याप्रकरणाचा तपास उपनिरीक्षक धनश्री पाटील (Sub-Inspector Dhanashree Patil) यांनी करत आरोपी विरोधात सबळ पुरावे (Evidence) गोळा करून गुन्हा साबीत होण्याचे दृष्टीने जिल्हा न्यायालय नाशिक (district court nashik) येथे दोषारोपपत्र दाखल केले होते.
त्यानंतर सबळ पुराव्यांच्या आधारे जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक ०३ नाशिक न्यायाधीश एम. व्ही. भाटीया यांनी नराधम पित्यास आजन्म जन्मठेप व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभिवक्ता म्हणून रेवती कोतवाल यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार एम. एम. पिंगळे व कोर्ट अंमलदार सहाय्यक उपनिरीक्षक डी. डी. कडवे यांनी आरोपीला शिक्षा लागण्याच्या दृष्टीने वेळोवेळी पाठपुरावा केला.