जखमी मोराच्या पिलास जीवदान

जखमी मोराच्या पिलास जीवदान

नामपूर । वार्ताहर | Nampur

बागलाण तालुक्यातील (baglan taluka) काकडगाव (Kakadgaon) येथे वन शेतातील बांबूच्या बागेत जखमी अवस्थेत

राष्ट्रीय पक्षी (National bird) असलेल्या मोराचे (Peacock) पिलू दिसून आल्याने शेतकरी (farmer) विनोद राजाराम पाटील यांनी पशु संवर्धन विभागाच्या (Department of Animal Husbandry) डॉक्टरांशी संपर्क साधत मोराच्या पिलावर उपचार करत त्यास जीवदान दिले.

उपचार झाल्यावर या पिलास पुन्हा वास्तव्याच्या ठिकाणी सोडून देण्यात आले. पाटील सकाळी वनशेतीत फिरत असतांना त्यांना बांबूच्या बागेत जखमी अवस्थेत मोराचा लहान पिल्लू (Peacock chick) दिसून आला.

जखमी पिलावर उपचार होण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे डॉ. चंदन रुद्रवन्सी (Animal Husbandry Department Dr. Sandalwood Rudravansi), दीपक माळवाल यांच्याशी संपर्क साधला त्यांनी सांगितल्यानुसार पाटील यांनी औषधे विकत आणून मोरावर उपचार केले. उपचार झाल्यावर मोराला शेतातील बांबू बागेतील मूळ वास्तव्याच्या ठिकाणी सोडून दिले. पाटील यांच्या शेतात दररोज सकाळी मोठ्या प्रमाणात मोराच्या थव्यांचे दर्शन होत असते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com