पन्नास व्यापार्‍यांचे परवाने निलंबित

नवीन-जुने व्यापारी वाद संपुष्टात; कांदा लिलावास प्रारंभ
पन्नास व्यापार्‍यांचे परवाने निलंबित

चांदवड । वार्ताहर Chandvad

जुन्या-नव्या व्यापार्‍यांच्या Traders वादात गत तीन दिवसांपासून ठप्प असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीतील chandvad APMC कांद्याचे लिलाव Onion Auction बाजार समिती प्रशासन तोडगा काढण्यात यशस्वी ठरल्याने आजपासून पूर्ववत झाल्याने गत तीन दिवसांपासून लिलावाच्या प्रतिक्षेत असलेल्या कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला.

दरम्यान, सुरू असलेला लिलाव अचानक बंद करण्यात आल्याने कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकर्‍यांची झालेली प्रचंड गैरसोयीची गंभीर दखल बाजार समिती संचालक मंडळाने घेतली असून याप्रकरणी लिलावातून काढता पाय घेणार्‍या सुमारे 50 व्यापार्‍यांचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करण्यात आला आहे.

जुने व नवीन व्यापारी हा वाद संपुष्टात आणण्यात आला असल्याने येत्या सोमवारपासून जुने 50 ते 60 व नवीन 20 ते 25 असे व्यापारी एकत्रितरित्या कांद्याच्या लिलावात सहभाग घेतील, अशी माहिती सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी दै.‘देशदूत’शी बोलतांना दिली.

येथील बाजार समितीतर्फे 20 ते 25 नवीन व्यापार्‍यांना कांदा खरेदीचा परवाना देण्यात आला आहे. या नवीन व्यापार्‍यांना लिलावात सहभागी होवू द्यावे, अशी भूमिका देखील समिती प्रशासनाची आहे. मात्र नवीन व्यापार्‍यांना लिलावात सहभागी करण्यास जुन्या व्यापार्‍यांचा तीव्र विरोध आहे. मात्र समितीच्या सर्व कायदेशीर बाबींची पुर्तता करत नवीन व्यापारी लिलावात सहभागी झाल्याने 11 जानेवारीस दुपारी 4 वाजेनंतर जुन्या व्यापार्‍यांनी अचानक लिलावातून काढता पाय घेतल्याने कांद्याचे लिलाव ठप्प झाले होते.

बाजार समितीत शेकडो वाहनातून कांदा शेतकर्‍यांनी विक्रीसाठी आणला होता. मात्र लिलाव ठप्प झाल्याने त्यांची गैरसोय झाली. नवीन व्यापार्‍यांतर्फे लिलाव केला गेला मात्र रिक्षा, पिकअप वाहनातून आणलेल्याच कांद्याचे लिलाव केले जात होते. यामुळे कांद्याचे भाव देखील घसरल्याने शेतकर्‍यांनी ठिय्या आंदोलन करत आपला संताप प्रगट केला.

व्यापार्‍यांच्या नव्या-जुन्या वादाची गंभीर दखल घेत बाजार समिती प्रशासनातर्फे समन्वय घडविण्याच्या दृष्टिकोनातून सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्यासह संचालकांनी प्रयत्न सुरू केले. कांदा विक्रीसाठी आणणार्‍या शेतकर्‍यांची गैरसोय होवू नये या दृष्टिकोनातून व्यापार्‍यांची आज बैठक घेण्यात येवून नवीन-जुने व्यापारी या वादावर तोडगा काढण्यात आल्याने ठप्प असलेला लिलाव पुन्हा पूर्ववत सुरू होवू शकला.

दरम्यान, व्यापार्‍यांतर्फे अकस्मात ठप्प करण्यात आलेल्या लिलावाची गंभीर दखल समितीतर्फे घेण्यात आली असून लिलावातून काढता पाय घेणार्‍या सुमारे 50 व्यापार्‍यांचा परवाना तीन दिवसांपासून निलंबीत Licenses of fifty traders suspended करण्यात आला असल्याची माहिती सभापती डॉ. कुंभार्डे यांनी दिली.

करोना उद्रेकामुळे सर्वत्र बाधीत रूग्णांची संख्या वाढत आहे. अशी बिकट परिस्थिती असतांना देखील व्यापार्‍यांनी लिलाव बंद ठेवल्याने कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकर्‍यांचे हाल झाले. त्यांना थंडीत समिती आवारात मुक्काम करावा लागला. पोलीस-बाजार समिती प्रशासन यंत्रणेने शेतकर्‍यांनी केलेल्या आंदोलनामुळे मोठा ताण पडला. अचानक लिलाव बंद करत शेतकर्‍यांना वेठीस धरण्याचा प्रकार केला गेला.

याची गंभीर दखल संचालक मंडळाने घेत सदर व्यापार्‍यांचे तीन दिवसांसाठी परवाने निलंबीत करण्यात आले आहे. सोमवारपासून नवीन-जुने व्यापारी एकत्रितरित्या लिलाव पुकारतील, अशी माहिती सभापती डॉ. कुंभार्डे यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com