जिल्ह्यात उद्यापासून पुन्हा पुस्तके बोलू लागणार !

जिल्हा ग्रंथालय अधिकारी जोपुळे यांची माहिती
जिल्ह्यात उद्यापासून पुन्हा पुस्तके बोलू लागणार !

दिंडोरी । Dindori

राज्यातील करोना परिस्थितीमुळे (State Corona Crisis) बंद असलेली सरकारमान्य ग्रंथालये (Goverment Library) आज दि. 13 जुलैपासून सुरु होणार असून पुन्हा पुस्तकांची रेलचेल वाचनालयामध्ये दिसणार आहे. याबाबत जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन जोपुळे (District Library Officer Sachin Jopule) यांनी आदेश दिले असून सार्वजनिक ग्रंथालय खुली (Public library open) होणार आहे.

करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर ग्रंथालय कक्षात गर्दी होऊ शकते. तसेच ग्रंथालयात येणार्‍या वाचकांना आणि ग्रंथालय सेवकांना (Library servant) करोना होवू शकतो, म्हणून ग्रंथालय 15 जून पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतरही कोविडचा प्रादुर्भाव (Corona Crisis) सुरु राहिल्याने मुदत वाढवण्यात आली.

तथापि राज्यातील करोनाची आकडेवारी (State Corona Statistics) आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता (Availability of oxygen beds) बघुन सर्व शासनमान्य ग्रंथालयांची सेवा मंगळवार दि. १३ जुलैपासून पुर्ववत करण्याचे आदेश जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन जोपूळे यांनी दिले आहे. शनिवार, रविवार ग्रंथालये बंद राहतील, इतर दिवशी इतर आस्थापणाप्रमाने दुपारी ४ वाजेच्या आत आपल्या वेळेनुसार ग्रंथालय चालवावी, कोरोना नियमांचे पालन करून ग्रंथालय सेवा सुरू राहील असे जोपुळे यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com