नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे करा

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची सूचना
नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे करा

जानोरी । वार्ताहर Janori

अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) नाशिक जिल्ह्यात (Nashik District) मोठ्याप्रणात शेती व शेतपिकांचे गुरे जनावरांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर शहरी भागासह गावांमध्ये पाणी शिरल्याने अनेक दुकाने, घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

बाधित भागातील नागरिक मोठ्या संकटात सापडले असून झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे (Punchnama) करून त्यांना शासनामार्फत आपत्कालीन मदत (Emergency help) मिळवून देण्याकरिता डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे (Collector Suraj Mandhare) यांना पत्र देऊन भ्रमणध्वनीवरून चर्चा करत सूचना केली आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 34 हजार 669 हेक्टर क्षेत्रावरील खरीप व भाजीपाला पिकांचे नुकसान (Damage to kharif and vegetable crops) झाले आहे.

त्यात सर्वाधिक नुकसान मालेगाव (Malegaon), येवला (Yeola) व नांदगाव (Nandgaon) तालुक्यात झाले आहे. मका पिकाचे सर्वाधिक नुकसान असून त्या खालोखाल बाजरीचे नुकसान असल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने (Department of Agriculture) सादर केला आहे. पंचनामे केल्यानंतर या नुकसानीची वास्तवदर्शी माहिती उपलब्ध होऊ शकेल. मका, बाजरी, सोयाबीन, कांदा रोपवाटिका यांचे 22345 हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून त्या खालोखाल नांदगाव तालुक्यात मका, बाजरी, फळबागा यांचे 10544 हेक्टरवर नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने दर्शविला आहे.

त्यानंतर निफाड तालुक्यात (Niphad Taluka) मका, सोयाबीन, कांदे यांचे 1770 हेक्टरवर नुकसान झाले आहे. दिंडोरी तालुक्यात (Dindori Taluka) 10 हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज देखील वर्तवला आहे. जिल्ह्यात खरीप व लेट खरिप कांद्याच्या साधारण 9200 हेक्टरवर रोपवाटिका असून त्यापैकी 2552 हेक्टर क्षेत्रावरील रोेपवाटिकांना या पावसाचा फटका बसला आहे.

खरिपातील मकाचे सर्वाधिक 18965 हेक्टरवर नुकसान झाले आहे. सोयाबीनचे 1381 हेक्टरवर नुकसान झाले असून बाजरीचे 6450 हेक्टरचे नुकसान झाले आहे. कपाशीचे सर्वाधिक नुकसान मालेगाव तालुक्यात झाले आहे. तेथे 4566 हेक्टरवरील कपाशीचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करावे.

अतिवृष्टीमुळे ठीकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे साथीच्या रोगाची शक्यता नाकारता येत नाही, यासाठी अगोदरच आरोग्य यंत्रणेंला (Health systems) सतर्क करून साथीच्या रोगांना वेळीच आटोक्यात आणण्यासाठी प्रभावी उपायजोजना कराव्यात जेणेकरून अगोदरच करोना संकटात सापडलेल्या नागरिकांना ह्याचा त्रास होऊ नये, यासाठी आरोग्याची पथके तयार ठेवण्याच्या सूचनाही केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health and Family Welfare Dr. Bharti Pawar) यांनी जिल्हाधिकार्‍यांना केल्या आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com