
सातपूर | प्रतिनिधी | Satpur
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर एनएमआरडीच्या (NMRDA) वतीने आरक्षित केलेल्या गावांमधील रस्त्यालगत नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) नवीन डीपीनुसार बाह्यवळण रस्त्यासाठी (Road) आमदार सीमा हिरे (MLA Seema Hire) यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना (CM) साकडे घालण्यात आले आहे. यावेळी एनएमआरडीच्या व्यवस्थापकीय संचालकांनाही पत्र देण्यात आले...
दर बारा वर्षांनी नाशिक- त्र्यंबकेश्वर (Nashik- Trimbakeshwar) नगरीमध्ये कुंभमेळा भरत असतो. त्याच पार्श्वभूमीवर गंगापूर, पिंपळगाव बहुला, बेलगाव ढगा, सारूळ, विल्होळी या गावांमधून एनएमआरडीने पूर्वी बाह्यवळण रस्ता आरक्षित केलेला आहे. मात्र, अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. तसेच या आरक्षित जागेला लागूनच असलेल्या पिंपळगाव बहुला येथील नवीन डीपी नुसार बाह्यवळण रस्त्याचेही काम मार्गी लागावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना साकडे घालण्यात आले आहे.
दरम्यान, यावेळी नएमआरडीचे व्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव (Kailas Jadhav) यांनाही पत्र देण्यात आले आहे. याप्रसंगी भाजप सातपूर मंडल अध्यक्ष भगवान काकड, दीपक नागरे, योगेश भावले, किरण भावले, गणेश भावले यांच्यासह आदी शेतकरी उपस्थित होते.