शेतमाल भावासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

शेतमाल भावासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

विंचूर। वार्ताहर | Vinchur

केरळच्या (Kerala) धर्तीवर महाराष्ट्रातील (maharashtra) शेतकर्‍यांना शेतीमालाला (Agricultural goods) आधारभूत दर मिळावे याबाबतची मागणी

ब्राम्हणगाव (Bramhangaon) (विंचूर) येथील शेतकरी (farmer) सुनील गवळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांना पाठविलेल्या पत्राद्वारे (letter) केली आहे.

पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्रात (maharashtra) सध्या शेतीचे प्रश्न खुप असून द्राक्षे, कांदे, टमाटे, फळे, भाज्या या मातीमोल भावाने विक्री होत आहे. याकडे सत्ताधार्‍यांचे वा विरोधकांचे लक्ष नसल्यामुळे तुम्ही शेतकर्‍यांची तळमळ जाणून घेवून केरळ राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेती पिकांना आधारभूत किंमत जाहीर करावी. केरळ राज्याचे मुख्यमंत्री पी विजयन (Chief Minister P Vijayan) यांनी त्यांच्या केरळ राज्यातील फळे, पाल्या-भाज्या यांचे दर उत्पादन खर्चापेक्षा 20 टक्के अधिक निश्चित केले आहे.

सध्या केरळ सरकारने 16 फळे, भाजीपाल्याचे दर निश्चित केले असून ते 1 नोव्हेंबर पासून अमलात येणार आहेत. त्या राज्यातील शेतकर्‍यांसाठी फळे, आणि पालेभाज्यांचे किमान भाव (एम.एस.पी) निश्चित करणारे केरळ (Kerala) हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. त्यामुळे केरळ नंतर महाराष्ट्र राज्य (State of Maharashtra) हे देशातील दुसर्‍या क्रमांकावर असावे.

फळे, भाज्यांचे दर जर निश्चित केले तर शेतकरी चांगल्या प्रतीचे, पाल्याभाज्याचे उत्पादन अधिक घेतील. त्यामुळे आपण लवकरात लवकर पावले उचलावीत तसेच शेतकर्‍यांना रासायनिक खते (Chemical fertilizers) वेळेवर मिळत नाही. अशा एक ना अनेक समस्यांनी शेतकरी भरडला जात आहे. म्हणून मी या पत्राद्वारे मागणी करीत आहेत.

आपण या पत्राची दखल घेवून शेतकरी (farmers) हिताचे निर्णय घ्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. ब्राम्हणगावच्या शेतकर्‍याने पाठविलेल्या पत्राची मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन शेतीमालाला आधारभूत भाव देणार का याबाबत विंचूर, ब्राम्हणगावसह परिसरातील शेतकर्‍यांमध्ये उत्सुकता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com