जितेंद्र आव्हाडांसह बारामतीच्या चौधरींवर गुन्हा दाखल करा

ओबीसी सुवर्णकार समितीचे अध्यक्षांचे पोलीस आयुक्तांना पत्र
जितेंद्र आव्हाडांसह बारामतीच्या चौधरींवर गुन्हा दाखल करा
न्यूज अपडेट/News Updateन्यूज अपडेट/News Update

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

एसटी कर्मचाऱ्यांसाठी (ST Workers) लढणारे ॲड. गुणरत्न सदावर्तेंची (Gunaratna Sadavarte) तसेच बारामतीचे कामगार नेते चौधरी यांनी केलेले आक्षेपार्ह विधान तसेच उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) यांच्याविरुद्ध अपशब्द वापरून छत्रपतींचा अवमान करणारे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात राज्य शासनाने गुन्हा नोंदवावा, अशा मागणीचे पत्र महाराष्ट्र राज्य ओबीसी सुवर्णकार समितीचे अध्यक्ष गजू घोडके (Gaju Ghodke) यांनी नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Deepak Pandey) यांना दिले...

पत्रात म्हंटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर एसटी कामगारांनी केलेला हल्ला मुळीच समर्थनीय नाही. मात्र एसटी कामगारांच्या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या 105 आंदोलकांच्या कुटुंबीयांचा हा एकप्रकारे आक्रोश होता काय? हे तपासण्याची गरज आहे.

गुणरत्न सदावर्ते हे एसटी कामगार आंदोलनाचे (ST Workers Strike) नेतृत्व करीत होते. पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याशी सदावर्ते यांचा संबंध नसतानाही त्यांना या प्रकरणात नाहक अडकवण्यात आले.

त्यांच्यावर एकापाठोपाठ एक गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच बारामतीचे कामगार नेते तुकाराम चौधरी (Tukaram Chaudhary) यांनी जाहीर भाषणात सदावर्ते तसेच महिला आंदोलकांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. ते स्वतः कामगार नेते असताना अशी भाषा वापरत असतील तर त्याला काय म्हणावे? शासनाने त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवावा.

तसेच शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी त्यावर त्यांच्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली. ही प्रतिक्रिया न रुचल्याने महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अवमानकारक शब्द वापरून केवळ उदयनराजे यांचाच नव्हे तर समस्त छत्रपती घराण्याचा अवमान केला आहे. उदयनराजेंबाबतचे त्यांचे वक्तव्य आक्षेपार्ह असल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.