आता खऱ्या अर्थाने आपली परीक्षा सुरू : डॉ. पवार

आता खऱ्या अर्थाने आपली परीक्षा सुरू : डॉ. पवार

सभागृहापुढे नतमस्तक होत केला प्रवेश

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

केंद्र शासनाच्या (Central Government) पावसाळी अधिवशेनाला सोमवारी (दि.१९) सुरुवात झाली. अधिवशेनाच्या पहिल्याच दिवशी केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Minister of State for Health and Family Welfare Dr. Bharti Pawar) यांनी राज्यमंत्री झाल्यानंतर संसदेत प्रवेश करण्यापूर्वी देशाच्या सर्वोच्च सभागृहाला नतमस्तक झाल्या. ‘आता खऱ्या अर्थाने आपली परीक्षा सुरू झाली आहे. मंत्रिपदाच्या माध्यमातून सामान्यांना न्याय देणार असल्याची भावना डॉ. पवार यांनी यावेळी व्यक्त केली...

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या बहुचर्चित मंत्रीमंडळाच्या विस्तारात दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांना संधी देत सर्वानाच अनपेक्षित धक्का दिला.

डॉ. पवार यांच्याकडे आरोग्य व कुटुंबकल्याण विभागाच्या राज्यमंत्रीपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. शपथविधीनंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी सूत्रे स्वीकारत कामकाजाला प्रारंभ देखील केला. यातच नाशिक जिल्ह्यातून (Nashik District) दिल्लीत (Delhi) त्यांच्या स्वागतासाठी रांगा लागल्या. सर्वांच्या भेटी घेऊन हितगुज साधत, रात्री उशीरापर्यंत खात्याचे कामकाज डॉ. पवार यांनी समजावून घेतले. खासदारांनी उपस्थित केलेले प्रश्न समाजावून घेतले.

संसदेच्या अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात झाली . त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांचे कामकाज सुरू झाले. संसदेच्या अधिवेशनाला प्रवेश करण्यापूर्वी डॉ. पवार यांनी सकाळी सभागृहापुढे नतमस्तक होत प्रवेश केला. सभागृहात गेल्यानंतर सर्वपक्षीय खासदारांनी त्यांचे स्वागत केले. महिला खासदारांनी शुभेच्छा दिल्या.

सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य

पंतप्रधान मोदी यांनी मोठी जबाबदारी सोपविली आहे. माझ्या आवडत्या खात्यात मला काम करण्याची संधी मिळाली आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संकटाचा सामना करायचा आहे. या माध्यमातून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. देशभराची जबाबदारी सांभाळतानाच माझ्या नाशिक जिल्ह्यातील सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास सातत्याने प्राधान्य देईल.

- खा. डॉ. भारती पवार

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com