अनुदानाचा प्रश्न मार्गी लावू

पालकमंत्री भुजबळ यांचे आश्वासन
अनुदानाचा प्रश्न मार्गी लावू

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

अतीवृष्टीमुळे (heavy rains) शेतमालाची हानी झालेल्या शेतकर्‍यांच्या (Farmers) नुकसानीचे पंचनामे यंत्रणेतर्फे झाले असून शासनातर्फे अतीवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना भरपाई अनुदान (Compensation grant) दिले जात आहे. प्रलंबित शेतकर्‍यांना अनुदानाचे वाटप व्हावे यासाठी त्वरीत जिल्हाधिकार्‍यांसह संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेवून हा प्रश्न विनाविलंब मार्गी लावला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांनी येथे बोलतांना दिले.

नांदगाव (Nandgaon) येथे अतीवृष्टी व महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ नांदगाव येथे जात असतांना ते मालेगावी थांबले असता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेंद्र भोसले (Rajendra Bhosle), उपाध्यक्ष महेश शेरेकर, विनोद शेलार, दिनेश ठाकरे, प्रकाश वाघ आदी नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते, शेतकर्‍यांनी त्यांची भेट घेत प्रलंबित अनुदानाचे वाटप करण्याची मागणी केली.

शासनाने 2020 मध्ये झालेल्या अतीवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करीत अनुदान दिले होते. मात्र 44 गावात अद्यापही 26 कोटी 10 लाख रूपयांचे अनुदानाचे वाटप शेतकर्‍यांना झालेले नाही. यावर्षी देखील उशीरा आलेल्या व मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे शेतमालाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. कांद्यास भाव नसल्याने तो चाळीतच सडत आहे.

तसेच भाजीपाला (Vegetables) तर अक्षरश: कवडीमोल किंमतीत विकावा लागत असल्याने शेतकरी (Farmers) बांधव मोठ्या आर्थिक संकटात (financial crisis) सापडले आहेत. गतवर्षी झालेल्या अतीवृष्टीमुळे नुकसानीचे अनुदान अद्याप मालेगाव तालुक्यातील 44 गावातील शेतकर्‍यांना मिळालेले नाही. अतीवृष्टीचा सर्वाधिक फटका ज्या गावांना मोठ्या प्रमाणात बसला असतांना देखील त्याच गावातील शेतकरी मात्र अद्याप अनुदानापासून वंचित असल्याकडे राजेंद्र भोसले यांनी पालकमंत्री भुजबळ यांचे लक्ष वेधले.

26 कोटी 10 लाखाचे अनुदान प्राप्त झाले असले तरी यंत्रणेच्या दिरंगाईमुळे त्याचे वाटप शेतकर्‍यांना झालेले नाही. त्यामुळे या अनुदानाचे तात्काळ वाटप व्हावे तसेच यावर्षी देखील झालेल्या अतीवृष्टीमुळे खरीप पिकांसह फळबागा (Orchards) तसेच भाजीपाल्याची अतोनात हानी झाली आहे. या नुकसानीचे पंचनामे करून देखील आपद्ग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई देत दिलासा द्यावा, अशी मागणी भोसले यांच्यासह पदाधिकार्‍यांनी भुजबळ यांच्याकडे केली.

शिष्टमंडळात तालुकाध्यक्ष संदीप पवार, कार्याध्यक्ष अनंत भोसले, किशोर इंगळे, नरेंद्र शिसोदे, सुधीर चव्हाण, सुनिल देसले, काशिनाथ महाजन, केदा पाटील, रतन हलवर, अनील तेजा, विजय पवार, बाळू वाणी, अजित सूर्यवंशी, सुचेता सोनवणे, हेमलता मानकर आदींसह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com