शासकीय खरेदी केंद्राकडे मका उत्पादक शेतकऱ्यांची पाठ

जिल्ह्यात दोन हजार क्विंटल मका खरेदी
शासकीय खरेदी केंद्राकडे मका उत्पादक शेतकऱ्यांची पाठ


नाशिक । Nashik
खुल्या बाजारात मकाला चांगला दर (maize in open market) मिळत असल्यामुळे शासकीय खरेदी केंद्राकडे (Government Shopping Center) जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांनी (Maize Farmers) पाठ फिरविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध केंद्रांवर केवळ सुमारे दोन हजार क्विंटल इतकीच मका खरेदी (Maize Purchase) झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

मका खरेदीचे जिल्ह्यात हमी भावाने ३० हजार क्विंटल इतके उद्दिष्ट आहे. केंद्रांकडून संदेश पाठविलेल्या ५३६ पैकी केवळ ५८ शेतकऱ्यांनीच या खरेदी केंद्रांवर मका विक्री केली आहे. जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये (District Bajar samiti) मकाला सरासरी १८०० रुपये क्विंटलचा दर मिळत आहे. तर शासकीय खरेदी केंद्रांवर १८५० रु हमीभावाने मकाची खरेदी केली जात आहे.


काही बाजार समित्यांमध्ये काहीवेळी या दरापेक्षा अधिक दर मिळतो. शिवाय पैसेही रोख स्वरुपात मिळत आहेत. यामुळे शेतकरी खुल्या बाजारात मका विक्रीस अधिक पसंती देत आहेत. यामुळे मार्केटिंग फेडरेशनला ( Marketing federation) जिल्ह्यासाठी देण्यात आलेले ३० हजार क्विंटल खरेदीची उद्दिष्ट पूर्ण होनार का ? याबाबत प्रश्नचिन्ह आहे.


मागील महिन्यापासून खरेदी केंद्रांवर नोंदणी (Registration For Maize Purchase) सुरु होती. या काळात एकूण ६५५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी ५३६ शेतकऱ्यांना मका विक्रीसाठी आणावा, असे संदेश पाठविण्यात आले होते. त्यापैकी केवळ ५८ शेतकऱ्यांनीच माल विक्रीसाठी आणला आहे. १९२३ क्विंटल मका खरेदी करण्यात आली असून, २९ लाख ४६ हजार १२५ रुपयांचे पेमेंट करण्यात आले आहे.


गहू विक्रीसाठी केवळ येवल्यात १ आणि देवळा येथे ३ अशा एकूण चार शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी देवळा येथील खरेदी केंद्रावरून तीन शेतकऱ्यांना गहू विक्रीसाठी आणण्यासाठी संदेश पाठविण्यात आले होते, पण एकाही शेतकऱ्याने या ठिकाणी गहू विक्रीसाठी आणला नसल्याने अद्याप गव्हाची खरेदीच झालेली नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com