वडनेरला बिबट्याचा मुक्त संचार

वडनेरला बिबट्याचा मुक्त संचार

देवळाली कॅम्प । प्रतिनिधी Deolali Camp

वडनेर दुमालाच्या Vadner Dumala रेंजरोड मळे परिसरात बिबट्याचा Leopard मुक्त संचार होत असून या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.

दारणासह आता वालदेवी नदीच्या Valdevi River परिसरात असलेल्या वडनेर दुमालाच्या रेंजरोड परिसरातील नितीन पोरजे यांच्या ऊसाच्या मळ्यात बिबट्याचा मुक्त संचार होत असल्याचे वेळोवेळी दिसून आल्याचे शेतमालक नितिन पोरजे यांनी सांगितले.

ऊसतोड सुरू झाली की उसात लपलेले बिबटे बाहेर पडतात आणि लपण्यासाठी कुंपण शेधत असतात नितीन पोरजे यांच्या ऊसाच्या शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे ही दिसुन आले असून या भागात वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी नितिन पोरजे, सागर पोरजे, प्रकाश पोरजे, रमेश पोरजे, आकाश पोरजे, राहुल पोरजे, योगेश पोरजेसह स्थानिक शेतकर्‍यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com