नाशिक-पुणे महामार्गावर बिबट्या जेरबंद
बिबट्या

नाशिक-पुणे महामार्गावर बिबट्या जेरबंद

नाशिक रोड । Nashik

नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या गांधीनगर येथील लष्करी भागात असलेल्या कों बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या आवारात एक बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाला आहे.

या परिसरात गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू होता तसेच गांधीनगर विमानतळाच्या धावपट्टी वर सुद्धा बिबट्या रात्रीच्यावेळी फिरत असल्याचे अनेक जवानांनी बघितले होते त्यामुळे प्रशिक्षण केंद्र प्रशासनाच्यावतीने वनविभागाकडे या भागात पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली होती.

या मागणीनुसार वनविभागाने या भागात पिंजरा लावला होता दरम्यान तब्बल आठ दिवसानंतर याठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अखेर जेरबंद झाला सदरचा बिबट्या हा पाच वर्षे वयाचा आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com