दिंडोरीत बछड्यांसह बिबट्याचे वास्तव्य

दिंडोरीत बछड्यांसह बिबट्याचे वास्तव्य

दिंडोरी । प्रतिनिधी | Dindori

दिंडोरी तालुक्यात (dindori taluka) बिबट्याचे (Leopard) अनेक ठिकाणी दर्शन होत असल्याने शेतकर्‍यांमध्यें (farmers) भीतीचे वातावरण पसरले आहे.

दिंडोरी शहरातही बिबट्याचे आगमण झाल्याने शहरवासियांमध्ये घबराटी पसरले आहे. तीन दिवसांपुर्वीच मुरकूटे वस्तीवर बिबट्याने एकास जखमी केले होते. आता पुन्हा काल रात्री शहरातील बदादे वस्तीवर बिबट्याने दर्शन दिल्याने वनविभागाने (Forest Department) बिबट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरवासियांनी केली आहे.

मागील काही दिवसांपासून दिंडोरी शहरात (dindori city) बिबट्याचे वास्तव्य आढळून येत आहे. चार दिवसांपुर्वी मुरकूटे वस्तीवरील 40 वर्षीय इसमावर बिबट्याने हल्ला करुन जखमी केले होते. यावर नगराध्यक्षा मेघा धिंदळे यांनी पिंजरा लावण्याची मागणी (Demand for cages) केली होती. परंतू वन विभागाने पिंजरा लावण्याची परवानगी नागपूर (nagpur) येथील वरिष्ठ कार्यालयातून घ्यावी लागते असे सांगितल्याचे कळते.

सदर बिबट्या नरभक्षक असल्याचे सिध्द झाल्याशिवाय त्याला पकडण्याचे प्रयत्न केले जात नाही. त्यासाठी त्याने दोन पेक्षा अधिक नागरिकांवर जीवघेणा हल्ला करण्याची आवश्यकता असते, असा अजब नियम वनविभागाचे असल्याचे समजते. बिबट्याचा (Leopard) बंदोबस्त करण्यासाठी नागरिकांचा बळी जाईपर्यंत वाट बघायची का? असा संतप्त सवाल विचारला जात आहे. संबंधित विभागाने जनतेची संयमाची परिक्षा न बघता सदर बिबट्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे.

सोमवारी दिंडोरी शहरातील बदादे वस्तीवर ऊस तोड चालू असतांना एक पंधरा दिवस वयाचा नर बछडा आढळला होता. त्याची माहिती नगरसेविका सुनीता लहांगे (Corporator Sunita Lahange) यांना समजताच त्यांनी संबंधित वन विभागाला (Forest Department) याबाबत माहिती दिली. संबंधित विभागाचे अधिकारी त्या स्थळी येत त्यांनी त्या बछड्याला मादीकडे सुपूर्द करण्यासाठी इको संस्थेचे स्वंयमसेवक, स्थानिक शेतकरी, नगरसेविका सुनीता लहांगे यांच्या सहकार्याने सापडलेल्या ठिकाणी पुन्हा शेतात ठेवण्यात आले. त्यावेळी तो परिसर सीसीटीव्हीच्या निरागाखाली ठेवण्यात आला.

रात्री 8.21 वाजता सदर मादी येवून त्या बछड्यास घेवून गेली. ते सर्व सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहे. यावरुन बिबट्याचे वास्तव्य पुन्हा सिध्द झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. तरी संबंधित विभागाने याची गांभीर्याने दखल घेत बिबट्याचा बंदोबस्त करुन दिंडोरीकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

दिंडोरी शहरालाही बिबट्याच्या दशहतीखाली रहावे लागत आहे. ही बाब जरा आश्चर्यकारक म्हणावे लागेल. चार दिवसांपुर्वी एका इसमावर हल्ला झाला. काल पुन्हा बछडा घेवून जातांनाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले. यावरुन बिबट्या असल्याचे सिध्द झाले आहे. दिंडोरीकरांमध्ये या घटनांमुळे घबराटीचे वाताावरण पसरले असून संबंधित विभागाने लवकरात लवकर यावर उपाययोजना करावे, अशी अपेक्षा व्यक्त करते. शेतात अथवा निर्जनस्थळी वास्तव्यास असलेल्या दिंडोरीकरांनी आपली व कुटूंबाची विशेष काळजी घ्यावी. विशेषत: रात्रीच्या वेळी लहान मुलांना सांभाळावे. घराच्या बाहेर प्रकाशाची व्यवस्था करावी. बिबट्या निर्दशनास आल्यास त्वरीत संपर्क साधावा असे आवाहनही मी दिंडोरी वासियांना करते.

- सुनीता लहांगे, महिला व बालकल्याण समिती सभापती, दिंडोरी नगरपंचायत

Related Stories

No stories found.