
नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
गेल्या काही दिवसांपासून एकलहरे परिसरात (Eklahre Area) असलेल्या गंगावाडी भागात (Gangawadi Area) धुमाकूळ घालणारा बिबट्या (Leopard) अखेर आज पहाटेच्या सुमारास वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. त्यामुळे या भागातील नागरिक व शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, एकलहरे-गंगावाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना बिबट्याचे दर्शन होत होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.त्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा (Cage) लावण्यात यावा, अशी मागणी येथील नागरिकांनी वनविभागाकडे (Forest Department) केली होती. त्यांच्या या मागणीनुसार वनविभागाने अरुण विश्राम धनवटे मौजे गंगावाडी एकलहरे यांच्या मालकीच्या गट क्रमांक ४०९ परिसरात पिंजरा लावला होता.
यानंतर या पिंजऱ्यात आज पहाटे सहा ते सात वर्षाचा नर जातीचा बिबट्या जेरबंद (Jailed) झाला. यावेळी बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला असल्याचे समजताच नागरिकांनी वनविभागाचे अधिकारी अनिल आहेरराव व त्यांच्या सहकाऱ्यांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी येऊन बिबट्याला ताब्यात घेतले.