बिबट्या चक्क भरवस्तीत शिकारीसाठी बसला ठाण मांडून

बिबट्या चक्क भरवस्तीत शिकारीसाठी बसला ठाण मांडून

म्हेळुस्के | वार्ताहर | Mheluske

दिंडोरी तालुक्यातील म्हेळुस्के येथे शिकारीसाठी बिबट्याने चक्क भरवस्तीत झाडावरच ठाण मांडल्याने परिसरात भीतीचे वातावरण झाले आहे...

याबाबत सविस्तर वृत्त असे की, म्हेळूस्के गावात राजाराम गांगुर्डे हे वास्तव्यास असून सायंकाळी ८ वाजेच्या दरम्यान एक मांजर येऊन त्यांच्या घराजवळ येऊन बसली. याच संधीचा फायदा घेऊन अगोदरच झाडावर येऊन बसलेल्या बिबट्याने झाडावरून मांजरावरती झेप घेतली. हे बघून जवळच असलेल्या गांगुर्डे यांच्या पत्नी घरात पळून गेल्या. मांजरही बिबट्याची शिकार होऊ शकली नाही.

बिबट्या चक्क भरवस्तीत शिकारीसाठी बसला ठाण मांडून
Nashik Crime News : दोन संशयितांकडून सहा दुचाकी हस्तगत

एवढ्या रहदारीच्या व वहिवाटीच्या ठिकाणी बिबट्याचा वावर वाढल्याने गावातदेखील भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याने यापुर्वीही म्हेळूस्के परिसरात, वाडी-वस्त्यांवर नागरिकांच्या पशुधनाची हानी केलेली असून एका तीन वर्षीय बालकाला आपला जीव गमवावा लागलेला आहे.

म्हेळुस्के गावालागतच नदी असल्याने व बहुतांशी शेतकऱ्यांचे मुख्य पिक ऊस असल्याने बिबट्याला लपण्यासाठी मोठ्या प्रमाणावर क्षेत्र उपलब्ध आहे. अनेकदा बिबट्याचे दिवसाही दर्शन होणे नित्याचेच झाले आहे. वनविभागाने याठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

बिबट्या चक्क भरवस्तीत शिकारीसाठी बसला ठाण मांडून
Accident News Viral Video : भरधाव ट्रकची व्हॅनला धडक; चौघांचा मृत्यू
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com