झाडावर झुंज करणारे बिबटे आता पोहोचले छतावर

झाडावर झुंज करणारे बिबटे आता पोहोचले छतावर

उजणी | वार्ताहर

सिन्नर ता. मौजे सांगवी येथे (दि. १७) रोजी दोन बिबट्यांची नारळाचे झाडावरील चढाई सर्वांनीच पहिली. सोशल मीडियावर बिबट्यांचा नारळाच्या झाडावरील धिंगाणा सर्वांनीच पाहिला. कारण या अगोदर बिबट्यांना नारळाचे झाडावर चढतांना सहसा कुणी पाहिले नव्हते...

हे बिबटे काल (दि.१९) रोजी सांगवी परिसरातील खोलवाट म्हणून परिचित असलेल्या परिसरात उगले यांच्या बंगल्यावर सायंकाळी ०६ वाजता दिसून आले. स्थानिक शेतकरी देविदास घुमरे यांच्या आईचे अचानक उगले यांच्या बंगल्याकडे लक्ष गेले असता बिबट्या बंगल्याच्या भिंतीवरून चालतांना दिसला.

त्याच क्षणी देविदास घुमरे यांनी बिबट्याची छबी आपले मोबाईलमध्ये घेतली. घरमालक उगले यांच्या शेतातील बंगल्यात सध्या कुणीही रहात नाही. उगले हे वास्तव्यास बाहेरगावी आहे. म्हणूनच की काय बिबट्यांनी वास्तव्यासाठी घराची निवड केली असावी, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये होत आहे. दोन दिवसापुर्वीचे बिबट्यांचे नारळाचे झाडावरील दृश्यापासून उगले यांच्या घराचे अंतर अंदाजे एक किमी. आहे.

झाडावर झुंज करणारे बिबटे आता पोहोचले छतावर
माजी नगरसेवक बंटी तिदमे शिंदे गटात, मिळाली 'ही' मोठी जबाबदारी

गेल्या तीन ते चार दिवसांपासून परिसरातील मुसळधार पाऊस सुरु आहे. परिसरातील द्राक्ष छाटणी हंगाम आता सुरु होईल. या बिबट्यामुळे संपुर्ण सांगवी व आजुबाजूचे रहिवाशी, शेतकरी प्रचंड दहशतीच्या वातावरणात आहे.

तरी वन विभागाने शेतकरी व त्यांच्या पशुधनाची हानी होण्याअगोदरच पिंजऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

झाडावर झुंज करणारे बिबटे आता पोहोचले छतावर
पालकांनो सावधान! आठ महिन्यांच्या चिमुरड्याने गिळले नेलकटर
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com