दिंडोरी : लखमापूर, दहेगाव शिवारात बिबट्याची दहशत

पिंजरा लावण्याची मागणी
बिबट्या
बिबट्या

ओझे । Oze

दिंडोरी तालुक्यातील लखमापूर, दहेगाव वागळुद व परिसरात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही अनेक दिवसांपासून लखमापूर, दहेगाव वागळुद, म्हेळुसके, ओझे, करजंवण, परमोरी, अवनखेड परिसरात बिबट्या ची दहशत मोठ्या प्रमाणावर आहे. बिबट्याने अनेक जनावरे, पाळीव प्राण्यांचा फडशा पाडला आहे. तसेच अनेकदा नागरिक व लहान बालकांवर हल्ले करूनजखमी केले. सध्या बिबट्याचेवास्तव्य हे दहेगाव वागळुद, परमोरी इ भागात जास्त प्रमाणात आढळून येत आहे. दररोज बिबट्याचे दर्शन होत असल्यामुळे दिवसा करोना व राञी बिबट्या हे समीकरण झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वनविभागाने काही ठिकाणी पिंजरे लावले आहे. परंतु अगोदर लखमापूर, करजंवण, परमोरी या भागात बिबट्या पकडण्यात वनविभागाला यश मिळाले. परंतु आता मात्र काही ठिकाणी पिंजरा लावून ही बिबट्या वनविभागाच्या हातावर तुरी देऊन पोबारा करीत आहे. वनविभागाने पिंजरा संख्या वाढवावी अशी मागणी परिसरातुन होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com