नांदगाव सदो
नांदगाव सदो
नाशिक

इगतपुरी : अखेर 'त्या' बछड्यांची 'आई' आली...!

पाच दिवसांपासुन मुक्काम : वनविभाग तळ ठोकून

Gokul Pawar

Gokul Pawar

इगतपुरी । Igatpuri

इगतपुरी तालुक्यातील नांदगावसदो येथे (दि.१५) रोजी पडक्या घरात बिबट्याचे चार बछडे आढळून आले होते. त्यानंतर या ठिकाणी बछड्यांची आई पाच दिवसापासून तळ ठोकून आहे.त्यामुळे वनविभाग सतर्क झाला आहे.

नांदगाव सदो येथील शेतकरी राजेंद्र तांदळे यांनी शेतात बांधलेल्या पडक्या घरात काही दिवसांपूर्वी बिबट्या मादीने बछड्यांना आणून सोडले होते. यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाने तातडीने या ठिकाणी बिबट्या आणि बछड्यांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. आज मादी बिबट्या आणि ४ बछड्यांची दृश्य वनविभागाच्या कॅमेरात कैद झाली आहेत.

या घटनेकडे वनविभाग नजर ठेवुन असुन सध्या या परीसरात अतिवृष्टी होत असल्याने तुर्त या घराच्या परीसरात वनरक्षकांचे पथक तैनात केलेले आहे. सीसीटीव्हीचे कंट्रोल नाशिक येथील उपवनविभागाच्या कार्यालयात असुन पाऊस कमी झाल्यावर ही बिबट्याची मादी या बछड्यांना पुन्हा जंगलात घेऊन जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या या परीसरात नागरीकांना येण्यास बंदी घातल्याची माहीती वनविभागाचे वनपाल पोपटराव डांगे यांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com