
सातपूर | प्रतिनिधी | Satpur
पिंपळगाव मोर येथील सोसायटीचे माजी चेअरमन पंढरीनाथ काळे (Pandharinath Kale) यांच्या अशोकनगर (Ashoknagar) येथील बंगल्याच्या बाल्कनीत बिबट्या (Leopard) आढळून आला आहे...
नाशिकमध्ये दररोज कोणत्या ना कोणत्या नागरी वसाहतीच्या भागात बिबट्या आढळून येतांना दिसत असतांनाच आज सातपूरच्या वर्दळीच्या ठिकाणी बिबट्या (Leopard) दिसल्याने नागरिकांची धावपळ उडाली.
वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या दर्शनामुळे नागरिक भयभीत झाले असून वावरतांना काळजी घेण्याची आवाहन पंढरीनाथ काळे यांनी सांगितले. बंगल्याची सुरक्षा भीत जवळपास ७ फुटांच्या भिंतीवरून बिबट्या उडी मारून बाथरूमच्या पोटमाळ्यावर (बाल्कनी) मध्ये बिबटयाने कब्जा करून ठान मांडले.
एकंदरीत आज शनिवार सुटीचा वार आहे शिवाय पाऊस देखील चालू असल्याने वर्दळ कमी आहे. घरातील व गल्लीतील अनेक लहान मुले रस्त्यावर खेळत असतात. आज जर मुले खेळत असते आणि बिबट्याने चिमुरड्यांवर हल्ला केला असता तर मोठी दुर्घटना घडली असती असे काळे यांनी सांगितले. या परिसरात वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले असून बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
रोजच बिबट्याची बातमी ऐकायला येत असतानाच आमचे शेजारी पंढरीनाथ काळे यांच्या पोटमळ्यावर बिबट्या दिसल्याचे समजले तात्काळ पोलीस कर्मचारी व वनविभागाचे अधिकारी रेस्क्यूसाठी हजर असून रेस्क्यूटीम तयारी करत आहे. परिसरातील अनेक युवक व नागरिक परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरी वर्दळ थांबवली आहे.
- योगेश शेवरे, माजी सभापती तथा माजी नगरसेवक